Samudrik Shastra : ज्योतिष शास्त्र अंकशास्त्र याप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र देखील असते. सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या शारीरिक जडणघडणानुसार व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसा असू शकतो या संदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.
म्हणजेच व्यक्तीच्या दिसण्यावरून, त्याच्या शारीरिक अवयवावरून व्यक्तीचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ कसा असू शकतो, त्या व्यक्तीचे करिअर त्याचा स्वभाव त्याचे व्यक्तिमत्व पैसा लग्न अशा वेगवेगळ्या बाबींची माहिती जाणून घेता येणे शक्य आहे असा दावा सामुद्रिक शास्त्रात करण्यात आला आहे.
सामुद्रिक शास्त्रात हाताची घडी बांधण्याची स्टाईल व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व अधोरेखित करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान आज आपण हाताची घडी बांधण्याच्या स्टाईलनुसार व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व कसे असते या संदर्भात सामुद्रिक शास्त्रात नेमके काय म्हटले गेले आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
उजवा हात डाव्या हातावर ठेवणे : सामुद्रिक शास्त्रानुसार जे लोक हाताची घडी बांधताना आपला उजवा हात डाव्या हातावर ठेवतात ते लोक भावनिक असतात. या लोकांचा डावा मेंदू हा अधिक सक्रिय असल्याचे म्हटले जाते. या लोकांना आपले जीवन संरचित आणि संघटित पद्धतीने जगायला आवडते.
दोन्ही हात समान ठेवणारे : हाताची घडी बांधताना जे लोक दोन्ही हात समान ठेवतात असे लोक भावना आणि तर्क यांचे उत्कृष्ट संतुलन साधतात असा दावा सामुद्रिक शास्त्रात करण्यात आला आहे. हे लोक कोणताही विवाद अगदी सहज सोडवण्याची क्षमता ठेवतात. हे लोक मध्यस्तीच्या भूमिकेत अनेकदा पाहायला मिळाले आहेत.
भांडण झाले असेल आणि असे लोक जर मध्यस्थी करत असतील तर नक्कीच ते भांडण सुटू शकते. या लोकांमध्ये खूपच आत्मविश्वास असतो आणि त्यांच्या कार्यात एक स्पष्टता असते. यामुळे अशा लोकांना त्यांच्या निर्णयावर पुन्हा पुन्हा विचार करावा लागत नाही त्यांनी घेतलेला निर्णय हा नेहमीच विचारपूर्वक असतो.
डावा हात उजव्या हातावर ठेवणे : जर तुम्ही हाताची घडी बांधताना आपला डावा हात उजव्या हातावर ठेवत असाल तर याचा अर्थ तुम्हाला लोकांच्या भावना समजतात. हे लोक भावनिक असतात. या लोकांची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता ही इतरांपेक्षा अधिक असते.