Sangamner MLA Amol Khatal News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात मोठा उलट फेर पाहायला मिळाला. आठ टर्म पासून म्हणजेच 40 वर्षापासून संगमनेरचे प्रतिनिधित्व करणारे बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात एका नवख्या तरुणाने पराभवाची धूळ चारली.
अमोल खताळ यांनी मुख्यमंत्री पदाचे दावेदार थोरात यांना पराभूत केले. यामुळे खताळ हे जायंट किलर ठरलेत आणि सध्या त्यांची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू आहे.
दरम्यान, अमोल खताळ आज विधिमंडळांच्या विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी समारंभ होणार असल्याने मुंबईत आले आहेत. यावेळी, आ. अमोल खताळ विधिमंडळ परिसरात एक खास टोपी घालून आलेत.
अमोल खताळ यांच्या डोक्यात एक खास भगवी गांधी टोपी पाहायला मिळाली. यामुळे भगवी गांधी टोपी घालण्याचे कारण? त्यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी भगवी गांधी टोपी घालण्याचे कारणही सांगितले.
काय बोललेत अमोल खताळ?
विधिमंडळ परिसरात अमोल खताळ यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी खताळ यांनी पुढील पाच वर्षांच्या काळात मतदारसंघासाठी काय करणार? याबाबत सविस्तर सांगितले. दरम्यान, त्यांच्या डोक्यावर खास भगवी गांधी टोपी असल्याचे पाहायला मिळाले.
म्हणून भगवी टोपी घालण्यामागचे कारण विचारल्यावर आमदार खताळ म्हणालेत की, ‘ही टोपी घालण्यामागे कोणताही वेगळा हेतू नाही. पण, ज्यावेळी मी विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करायला निघालो होतो, तेव्हा मतदारसंघातील युवकांनी ही टोपी दिली होती.
तेव्हापासून ही टोपी माझ्यासाठी चांगला शकुन ठरत आहे.’ खताळ यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आठ वेळेचे आमदार, मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार बाळासाहेब थोरात यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केले.
यामुळे जायंट किलर अमोल खताळ यांची निवडणूक निकालापासून सर्व दूर चर्चा सुरू आहे. थोरात यांच्यासारख्या नेत्याला पराभूत करणे सोपी बाब नव्हती मात्र अशक्य वाटणारी ही गोष्ट थोरात यांनी शक्य करून दाखवली.
निश्चितच खताळ यांच्या या विक्ट्रीमागे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे पाटील यांची यंत्रणा होती, हे कोणापासून लपून राहिलेले नाही.
विखे पिता पुत्रांनी थोरात यांचा पराभव करायचाच हा चंग बांधला होता आणि या दृष्टीने त्यांनी खताळ यांना संपूर्ण रसद पुरवली होती. त्यामुळे संगमनेर मध्ये जे 40 वर्षात घडलं नाही ते यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळालं.