स्पेशल

संगमनेर : वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावात बाळासाहेब थोरात अन विजयी उमेदवार खताळ यांना किती मत मिळालीत ?

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. खरंतर, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता. मात्र संगमनेरात यावेळी थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विखे कुटुंबाचे निकटवर्तीय अमोल खताळ यांनी शिंदे सेनेकडून निवडणुक लढवत बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेरमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना आव्हान देतील असे म्हटले जात होते. यामुळे येथे थोरात विरुद्ध विखे यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला भिडला होता. सुजय विखे पाटील यांनी येथून निवडणूक लढवण्यासाठी पूर्ण ताकतीनिशी सुरुवात सुद्धा केली होती.

ते काही काळ संगमनेरात स्वतः तळ ठोकून होते. त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील सुजयला माझा पाठिंबा आहे असं म्हणत त्यांच्या उमेदवारीला समर्थण दिले होते.

पण, प्रचारादरम्यान काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या विषयी सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी अगदीच बेताल वक्तव्य केले अन येथेच माशी शिंकली. धांदरफळ गावात झालेल्या सभेत वसंतराव यांनी बेताळ वक्तव्य केल अन या वक्तव्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेत आली होती.

दरम्यान या वक्तव्यामुळे सुजय विखे पाटील यांचे येथून तिकीट कापले गेले आणि त्यांच्या ऐवजी या ठिकाणी शिंदे गटाकडून अमोल खताळ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले अन खताळ यांनी थोरात यांच्या बालेकिल्लाला सुरंग लावले आहे.

अशा परिस्थितीत अनेकांच्या माध्यमातून धांदरफळ गावात कोणाला किती मते मिळालीत असा प्रश्न उपस्थित होत होता. दरम्यान धांदरफळ गावात महायुतीला अधिक मताधिक्य मिळाले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

खरेतर, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले अन त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाला. काँग्रेस या मुद्द्यावर कमालीची आक्रमक झाली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ सुद्धा केली. तर संगमनेर पोलीस स्टेशनबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी तब्बल 8 तास ठिय्या मांडला होता. मात्र या गावात सुद्धा शिंदे गटाचे अमोल खताळ यांना थोरातंपेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले.

धांदरफळ बुद्रुक आणि धांदरफळ खुर्द या गावात बाळासाहेब थोरात यांना 1847 आणि खताळ यांना 2945 एवढी मते मिळालीत. अर्थातच या गावात खताळ यांना 1098 मतांची लीड मिळाली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts