Sangram Jagtap News : नगर शहर विधानसभा मतदारसंघ एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र शिवसेनेचा हा बालेकिल्ला संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे खेचून आणला आणि आज जगताप हे या किल्ल्याचे एक सक्षम किल्लेदार म्हणून उदयास आले आहेत. जगताप यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला आपल्या नावावर केला आहे.
आता संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा येथून विजयी झाले असून विजयाच्या हॅट्रिक बरोबरच आता त्यांना आणखी एक मोठी जबाबदारी दिली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जगतापांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे पहिल्याच शपथविधी सोहळ्यात जगताप हे मंत्री पदाची शपथ घेतील अशी खात्रीलायक बातमी विश्वसनीय सूत्रांकडून हाती येत आहे. स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांनी नगर शहर विधानसभा मतदारसंघाचे 25 वर्ष प्रतिनिधित्व केले म्हणजेच ते पाच टर्म या मतदारसंघाचे आमदार राहिलेत.
दरम्यान दिवंगत अनिल भैया राठोड यांचा संग्राम जगताप यांनी 2014 मध्ये पराभव केला होता. तेव्हापासून संग्राम भैय्या हे नगर शहराचे प्रतिनिधित्व करत आहेत. खरे तर महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका झाल्यात.
संग्राम भैय्यांचा राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला अन पक्ष फुटी नंतर ते पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात होते. त्यामुळे यावेळी जगतापांचे काय होणार? शरद पवार गटाकडून त्यांना तगड आव्हान दिल जाईल, यंदाचा विजय जगताप यांच्यासाठी सोपा राहणार नाही, असे काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे होते.
पण जगताप यांनी आपल्या विकास कामांच्या जोरावर यावेळी निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. पहिल्या दोन निवडणुकांमध्ये जगताप यांना जेवढे लीड मिळालं नव्हतं, तेवढं लीड या निवडणुकीत मिळाले आहे.
यावेळी आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या समोर शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांचे आव्हान होते. मात्र या निवडणुकीत जगताप यांनी 39 हजार 650 मतांची आघाडी घेऊन विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे.
दरम्यान आता विजयाची हॅट्रिक पूर्ण केल्यानंतर जगतापांना मंत्री पदाची लॉटरी सुद्धा लागणार अशा चर्चा सुरू आहेत. खरेतर, अजितदादांना संकटाच्या काळात जगताप यांनी त्यांना साथ दिली. जगताप हे अगदी पहिल्यापासून अजितदादांच्या सोबत राहिलेत.
त्याचेच बक्षिस आता जगताप यांना दिले जाणार आहे. नव्या सरकारचा पहिला शपथविधी जेव्हा होईल त्याचवेळी आमदार संग्राम जगताप यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे अजितदादाच्या गटाकडुन आज स्पष्ट करण्यात आले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गेल्या 30 वर्षांपासून नगर शहराला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. मात्र, जर जगताप यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली तर नगर शहराला तब्बल 30 वर्षानंतर मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. जवळपास 1996 पासून नगर शहराला मंत्रीपद नाहीये. मात्र जगताप यांना यंदा 100% मंत्रीपद दिले जाणार आहे.