Sarkari Yojana:- समाजातील प्रत्येक घटकाचा सामाजिक, आर्थिक दृष्टिकोनातून विकास व्हावा या देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये समाजातील नागरिकांनी व्यवसाय उभारून त्यांना आर्थिक दृष्टिकोनातून समृद्ध जीवन जगता यावे या योजनामागील उद्देश आहे.
अशा योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी अनुदान स्वरूपात किंवा थेट आर्थिक मदत सरकारच्या माध्यमातून करण्यात येते. यामध्ये आपल्याला अनेक योजनांचा उल्लेख करता येईल. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून काही सुलभतेने कर्ज देणाऱ्या योजना देखील राबवल्या जात आहेत व या योजनांच्या माध्यमातून देखील तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कमीत कमी व्याजदरात आणि सहज भरता येईल अशा हप्त्यांवर कर्ज दिले जाते.
अशा योजनांच्या माध्यमातून तरुण व्यक्तींना आर्थिक मदत केली जाते. या मदतीमुळे त्यांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याचे आणि चालवण्याचे स्वप्न साकार करता येते. याच पद्धतीची एक योजना आहे व ती म्हणजे पंतप्रधान मुद्रा योजना होय. याच योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती या लेखात घेणार आहोत.
काय आहे पंतप्रधान मुद्रा योजना?
प्रधानमंत्री मुद्रा योजना ही लघु उद्योगांच्या स्थापनेला प्रोत्साहन मिळावे याकरिता सुरू करण्यात आलेली योजना असून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशांना आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते. पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार देत असते.
आपल्याला माहित असेलच की पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2015 मध्ये या योजनेची मुहूर्तमेढ रोवली. या योजनेच्या माध्यमातून बिगर कृषी लघु आणि सूक्ष्म उद्योग, गैर कॉर्पोरेट संस्था यांना अत्यावश्यक आर्थिक मदत या माध्यमातून देण्यात येते. विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून जे काही कर्ज मिळते ते तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या तारणाशिवाय मिळते.
तसेच या कर्जावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क आकारले जात नाही. तसेच घेतलेले कर्ज परतफेड करण्याच्या कालावधीत तुम्ही पाच वर्षापर्यंत वाढ करू शकता. यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे यात निश्चित व्याजदर नसून वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याजदर लागू करू शकतात. परंतु सरासरीच्या तुलनेत पाहिले तर दहा ते बारा टक्क्यांपर्यंत व्याजदर असतो.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून कुणाला मिळते कर्ज?
1- छोटे व्यवसाय तसेच लघुउद्योग सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी या माध्यमातून कर्ज दिले जाते.
2- कृषी उपक्रम याअंतर्गत मधमाशीपालन, मच्छी पालन आणि कुक्कुटपालना सारख्या व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींना पंतप्रधान मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकते.
कुठल्या संस्थेच्या माध्यमातून मिळते कर्ज?
या प्रामुख्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि इतर अधिकृत कर्ज देणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.
पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठीची पात्रता
पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत कर्ज देण्यासाठी तुम्ही ऑफलाइन किंवा ऑनलाईन अर्ज करू शकता. याकरिता अर्जदाराचे वय या योजनेअंतर्गत येणाऱ्या कर्जाकरिता पात्र होण्यासाठी वय 24 ते 70 वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
कुठली कागदपत्रे लागतात?
या योजनेच्या लाभ देण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट, मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे.
कर्ज मिळवण्यासाठी कुठे संपर्क कराल?
या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही आपल्या पद्धतीने अर्ज करू शकतात व याकरिता तुम्हाला कर्ज देणाऱ्या एखाद्या संस्थेची किंवा बँकेची संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही www.udyamimitra.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?
1- ऑनलाइन अर्ज करण्याकरता अगोदर तुम्हाला वर दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एका वेब पेजवर रिडायरेक्ट केले जाते व त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्मवर विनंती केल्यानुसार सर्व आवश्यक माहिती भरण्याची गरज असते.
2- आवश्यक सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होतो.
3- त्यानंतर तुमच्या कर्जाच्या विनंती वर प्रक्रिया केली जाते आणि मंजुरीसाठी काही दिवस लागण्याची शक्यता असते. कर्ज मंजूर झाल्यानंतर कर्जाची रक्कम तुम्ही अर्ज प्रक्रिया दरम्यान प्रदान केलेल्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते.
4- संबंधित बँकेला कोणत्याही जास्तीच्या माहितीची किंवा कागदपत्रांची आवश्यकता भासेल तर बँक तुमच्याशी संपर्क साधेल. प्रसंगी बँकेने मागितलेली सर्व कागदपत्रे प्रदान करण्यात करिता तुम्हाला परत बँकेला भेट देणे गरजेचे असते.
5- तसेच तुम्ही ऑनलाईन अर्ज करत असाल तर तो अचूक व परिपूर्ण भरणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला बँकेला भेट देण्याची गरज भासणार नाही.
6- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अर्ज आणि मंजुरी प्रक्रिया व्यवस्थित करण्याकरिता एक डिझाईन केलेली असून ही प्रक्रिया ही मुद्रा कर्जामध्ये प्रवेश करण्याचा एक सोयीस्कर मार्ग तुम्हाला प्रदान करते.