Satyajit Tambe On Old Pension Scheme : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. म्हणजेच 2005 नंतर सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली नाही. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांकडून वारंवार शासनाकडे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओपीयस योजना लागू करण्यासाठी मागणी केली जात आहे.
नवीन पेन्शन योजनेत असंख्य दोष असल्याने कर्मचाऱ्यांकडून ही मागणी जोर लावून धरली जात आहे. दरम्यान आता नासिक पदवीधर युवा मतदार संघाचे नवयुवक उमेदवार सत्यजित तांबे यांनी देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत एक मोठ वक्तव्य दिल आहे.
तांबे यांच्या मते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून यासाठी प्राधान्याने लढा उभारणार आहोत.नुकतेच नासिक येथे झालेल्या शिक्षक व पदवीधर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सत्यजीत तांबे यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. तांबे यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे.
तसेच राज्य कर्मचाऱ्यांची ओ पी एस योजनेची मागणी ही न्याय आहे. यामुळेच आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. तसेच जुनी पेन्शन योजनेसाठी स्वातंत्र्य अभ्यास गट निर्माण करावा आणि विधिमंडळात ही योजना लागू करण्यासाठी डॉक्टर सुधीर तांबे यांनी सातत्याने आग्रही मागणी केली असल्याचे सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.
सरकारने लागू केलेल्या एनपीएस योजनेत ग्रॅच्युईटी आणि फॅमिली पेन्शन चा समावेश नाहीये. परिणामी ही योजना राज्य कर्मचाऱ्यांसाठी अन्यायी राहणार आहे. विशेष म्हणजे या योजनेचे दोष लक्षात घेऊन छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान या राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी ओपीएस योजना पुन्हा लागू केली आहे.
जर छत्तीसगड सारखं छोटे राज्य ओ पी एस योजना लागू करू शकते तर महाराष्ट्र का नाही असे देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच तज्ञ लोकांचे एक शिष्टमंडळ घेऊन छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात जाऊन तेथील जुन्या पेन्शन योजनेचा अभ्यास करून तो संपूर्ण अहवाल राज्य शासनाकडे वर्ग करून राज्य शासनाला ops योजना लागू करण्यासाठी भाग पाडू असे देखील यावेळी तांबे यांनी नमूद केलं आहे.