SBI BOB And HDFC Personal Loan : जर तुम्हीही येत्या काही दिवसांत पर्सनल लोन घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा आणि एचडीएफसी बँकेच्या पर्सनल लोन ची तुलना करणार आहोत. या तिन्ही बँकांचे व्याजदराची आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
खरंतर, होम लोन, एज्युकेशन लोन, गोल्ड लोन पेक्षा पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज महाग मिळते. वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांपेक्षा अधिक असतात. हे कर्ज असुरक्षित कर्ज प्रकारात येते यामुळे बँका वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याज वसूल करतात.
अशा परिस्थितीत जर फारच इमर्जन्सी असेल आणि वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर कोणत्या बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे फायदेशीर ठरेल हे जाणून घेणे महत्वाचे असते. त्यामुळे आज आपण देशातील तीन प्रमुख बँकांच्या वैयक्तिक कर्जाच्या व्याजदराची गणना करणार आहोत.
एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्जासाठीचे व्याजदर
SBI बँकेचे वैयक्तिक कर्ज : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 11.45 ते 14.85 या दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
मात्र एसबीआय वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यासाठी कोणतेच प्रोसेसिंग चार्ज वसूल करत नाही. प्रोसेसिंग फी लागत नसल्याने एसबीआय बँकेचे वैयक्तिक कर्ज परवडते.
बँक ऑफ बडोदा चे वैयक्तिक कर्ज : बँक ऑफ बडोदा ही देखील देशातील प्रमुख सरकारी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 11.40% या फ्लोटिंग रेट ने आणि 11.15% या फिक्स रेटने वैयक्तिक कर्ज वापर करते.
सध्या बँक ऑफ बडोदा मध्ये फेस्टिवल ऑफर्स सुरू आहेत. या फेस्टिवल ऑफर्स मुळे बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासाठी कोणत्याच प्रकारचे प्रोसेसिंग चार्ज वसूल करत नाही.
HDFC : एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठी खासगी बँक. मार्केट कॅपिटल मध्ये देखील एचडीएफसी हीच मोठी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 10.75% दरात वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून देते. मात्र ही बँक प्रोसेसिंग फी म्हणून जवळपास साडेसहा हजार रुपयांपर्यंतची फी वसूल करते.
याचाच अर्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा यापेक्षा एचडीएफसी बँकेचे वैयक्तिक कर्जाचे व्याजदर ग्राहकांसाठी परवडणारे आहेत. पण एचडीएफसी बँकेकडून प्रोसेसिंग चार्ज वसूल केले जातात. यामुळे कर्ज घेताना यादेखील गोष्टीचा विचार करणे आवश्यक ठरणार आहे.