SBI FD Scheme : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. या बँकेत एफडी करणाऱ्यांची संख्या फार अधिक आहे. गेल्या काही वर्षात या बँकेने एफ डी वर चांगला परतावा दिलाय. म्हणून येथे फिक्स डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
महिला वर्ग देखील एसबीआय मध्ये मोठ्या प्रमाणात मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हीही एसबीआय मध्ये एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण एसबीआय बँकेच्या एका विशेष एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण एसबीआयच्या अशा एका एफडी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत.
ज्यात दहा लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच या योजनेतून गुंतवणूकदाराला चार लाख 49 हजार 948 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
एसबीआयची 60 महिन्यांची एफडी योजना ठरणार फायदेशीर
जर तुम्हाला लॉंग टर्म साठी एफडी करायची असेल तर एसबीआय बँकेची 60 महिन्यांची म्हणजेच पाच वर्ष कालावधीची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.50% आणि जेष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50% या रेटने परतावा दिला जातोय. अर्थातच या एफ डी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांपेक्षा एक टक्के अधिकचा व्याजदर लागू आहे.
यामुळे जर सीनियर सिटीजन ग्राहकांना पाच वर्ष कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर एसबीआय बँकेची ही योजना फायदेशीर ठरणार आहे.
जर समजा एखाद्या सामान्य ग्राहकाने एसबीआय बँकेच्या या एफडीमध्ये 10 लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटी वर म्हणजेच पाच वर्षाचा काळ पूर्ण झाल्यानंतर 13 लाख 80 हजार 420 रुपये मिळणार आहेत.
अर्थातच सामान्य ग्राहकांना तीन लाख 80 हजार 420 रुपये रिटर्न मिळणार आहेत. दुसरीकडे याच एफडी योजनेत सीनियर सिटीजन ग्राहकांनी दहा लाख रुपये गुंतवले तर त्यांना 14 लाख 49 हजार 948 रुपये मिळणार आहेत म्हणजेच सिनिअर सिटीजन ग्राहकांना चार लाख 49 हजार 948 रुपये रिटर्न मिळणार आहेत.