SBI FD Scheme : तुम्ही अल्प मुदतीच्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर SBI ची 444 दिवसांची खास FD तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. अलीकडे फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जर तुम्हालाही अल्प मुदतीच्या फिक्स डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एसबीआयचा पर्याय बेस्ट ठरणार आहे.
एसबीआय आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक विशेष FD योजना ऑफर करत आहे ज्याला अमृत वृष्टी योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेवर सर्वसामान्यांना ७.२५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ७.७५ टक्के व्याज दिले जात आहे.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे फक्त 31 मार्च 2025 पर्यंतच वेळ आहे. नक्कीच जर तुम्हाला एसबीआयच्या या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर लवकरात लवकर गुंतवणूक करावी लागणार आहे.
पण गुंतवणुकीच्या आधी या योजनेत तुम्ही ₹1,00,000 ते ₹5,00,000 ची गुंतवणूक केल्यास तुम्हाला किती परतावा मिळेल ते जाणून घेणे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे राहणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
5 लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार
₹ 5,00,000 च्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 7.75% दराने 48935.21 रुपये व्याज मिळेल म्हणजेच परिपक्वता रक्कम रुपये 548935.21 असेल. तर सामान्य नागरिकांना 7.25% दराने 45,667.69 रुपये व्याज मिळेल आणि परिपक्वता रक्कम 5,45,667.69 रुपये असेल.
चार लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
यात 4,00,000 रुपयाची गुंतवणुक केली तर ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत व्याज म्हणून 39,148.17 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 4,39,148.17 रुपये होईल. तर सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 36,534.15 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 4,36,534.15 रुपये होईल.
तीन लाखाची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?
3,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 29,361.13 रुपये व्याज म्हणून मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 3,29,361.13 रुपये होईल. तर सर्वसामान्य नागरिकांना 27,400.62 रुपये व्याज म्हणून मिळणार आहेत. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 3,27,400.62 रुपये होईल.
दोन लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार
2,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 19,574.08 रुपये व्याज मिळणार आहे. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम 2,195,74.08 रुपये होईल. तसेच, सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 18,267.08 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम रु. 2,18,267.08 होईल.
एक लाखाची गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?
1,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, ज्येष्ठ नागरिकांना 444 दिवसांत 9,630 रुपये व्याज मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम रु. 1,09,630 होईल. तर सामान्य नागरिकांना व्याज म्हणून 9,280 रुपये मिळतील. अशा प्रकारे मॅच्युरिटी रक्कम रु. 1,09,280 होईल.