स्पेशल

एसबीआयमध्ये FD करणाऱ्यांना मिळणार जबरदस्त परतावा! 180 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाख रुपयांचे गुंतवणूक केली तर किती रिटर्न मिळणार?

SBI FD Scheme : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिटवर जबरदस्त व्याज ऑफर करत आहे. ज्या लोकांना कमी दिवसात जास्त परतावा हवा असेल त्यांच्यासाठी एसबीआयची एफडी योजना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, आज आपण एसबीआयच्या 180 दिवसांच्या एफडी योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एसबीआयच्या या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना एसबीआय कडून किती व्याज दिले जाते, यामध्ये चार लाख रुपये गुंतवले तर गुंतवणूकदारांना किती रिटर्न मिळणारे या संदर्भात आता आपण माहिती पाहणार आहोत.

 

कशी आहे एसबीआयची 180 दिवसांची एफडी योजना

एसबीआय ही आपल्या ग्राहकांसाठी सात दिवसांपासून ते दहा वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर करते. एसबीआय FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना 3.50% पासून ते 7.25% पर्यंतचे व्याजदर ऑफर करते.

एसबीआयच्या 180 दिवसांच्या एफडी योजनेबाबत बोलायचं झालं तर या कालावधीच्या एफडी योजनेसाठी एसबीआय कडून सामान्य ग्राहकांना 6.25 टक्के या दराने व्याज दिले जात आहे.

तसेच सीनियर सिटीजन ग्राहकांना याच कालावधीच्या एफडी योजनेसाठी 0.50 टक्के अधिकचे व्याजदर दिले जात आहे. म्हणजे सीनियर सिटीजन ग्राहकांना 6.75 टक्के या दराने परतावा दिला जातोय.

चार लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार?

एखाद्या ग्राहकाने एसबीआयच्या 180 दिवसांच्या एफडी योजनेत जर चार लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच 180 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर एसबीआयकडून 6.25 टक्के या दराने चार लाख 12 हजार 422 रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच सामान्य ग्राहकांना 12 हजार 422 रुपये रिटर्न मिळतील. तसेच सीनियर सिटीजन ग्राहकांना याच कालावधीच्या एफडी मध्ये चार लाख रुपये गुंतवले तर चार लाख 14 हजार 427 रुपये मिळणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts