SBI Home Loan : ड्रीम होम चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही ही होम लोन घेण्याचा तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. विशेषता ज्यांना देशातील सर्वाधिक मोठ्या सरकारी बँकेतून अर्थातच एसबीआय मधून होम लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खूपच खास ठरणार आहे.
खरंतर एसबीआय आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देते. यामुळे अनेकजण एसबीआय कडून होम लोन घेण्याच्या तयारीत आहेत. मात्र एसबीआय होम लोन साठी किती व्याजदर आकारते? असा प्रश्न अनेकांच्या माध्यमातून उपस्थित केला जात होता.
दरम्यान आज आपण एसबीआय कडून दिल्या जाणाऱ्या होम लोन च्या व्याजदराची आणि जर एखाद्या ग्राहकाला एसबीआय कडून 40 लाख रुपयांचे गृह कर्ज 25 वर्ष कालावधीसाठी मंजूर झाले तर त्याला कितीचा मासिक हप्ता भरावा लागणार याबाबतचे संपूर्ण कॅल्क्युलेशन थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआयचे गृह कर्जाचे व्याजदर
मिळालेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना 8.50% ते 9.65% या व्याजदरावर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. एवढेच नाही तर एसबीआय कडून होम लोन घेतलेल्या ग्राहकांना टॉप-अप लोन देखील उपलब्ध करून दिले जाते.
यासाठी 8.80% ते 11.30% या रेटने व्याज वसूल केले जाते. ज्या लोकांचा सिबिल स्कोर हा चांगला असतो त्या लोकांना कमी व्याजदरात गृह कर्ज मिळते.
एसबीआय कडून चाळीस लाखांचे गृह कर्ज घेतले तर
जर समजा एसबीआय बँकेकडून 25 वर्ष कालावधीसाठी 40 लाख रुपयांचे गृह कर्ज 8.50% या किमान इंटरेस्ट रेट वर उपलब्ध झाले तर सदर ग्राहकाला 32 हजार 209 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजे सदर ग्राहकाला 96 लाख 62 हजार सातशे रुपये बँकेला द्यावे लागणार आहेत. अर्थातच या कर्जासाठी सदर कर्जदार ग्राहकाला 56 लाख 62 हजार 700 रुपये एवढे व्याज भरावे लागणार आहे.