स्पेशल

गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी कामाची बातमी! एसबीआय कडून 30 लाख रुपयांचे गृह कर्ज घेण्यासाठी किती पगार असायला हवा? पहा…..

SBI Home Loan News : अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर घेणे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरची गोष्ट होत आहे. हेच कारण आहे की अनेकजण घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृह कर्जाचा आधार घेतात.

गृह कर्जामुळे अनेकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे.

कारण की आज आपण एसबीआय बँकेकडून 30 लाख रुपयाचे गृह कर्ज घ्यायचे असेल तर किती पगार असायला हवा या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

एसबीआय बँकेकडून 30 लाखाचे गृह कर्ज हवे असल्यास पगार किती असायला हवा?
आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी एक हक्काचे घर असावे असे स्वप्न अनेकांचे असते. मात्र फारच कमी लोक असे आहेत जे की पूर्ण पैसे देऊन घर खरेदी करतात. बहुतांशी जनता ही होम लोन घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करत असते.

महत्त्वाचे म्हणजे देशातील अनेक प्रमुख बँका ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया देखील आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देते.

होम लोन हे लॉंग टर्मसाठी दिले जाते. यामुळे गृह कर्ज घेताना कायमच व्याजदरांची तुलना केली पाहिजे. ज्या बँकेकडून परवडणाऱ्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते त्याच बँकेकडून गृह कर्ज घेणे फायद्याचा सौदा ठरतो.

एसबीआय बँक बाबत बोलायचं झालं तर ही बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.50% पासून ते 9.65% पर्यंतच्या व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. दरम्यान जर तुमच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नसेल आणि 46,134 मासिक पगार असेल तर तुम्हाला तीस लाख रुपयांचे होम लोन मंजूर होऊ शकते.

30 लाखाचे होम लोन मंजूर झाल्यास कितीचा हप्ता भरावा लागेल
एसबीआय बँकेकडून किमान 8.50% या व्याज दरात तीस वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला 23 हजार 67 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.

म्हणजेच तुम्हाला 83 लाख 4,120 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच 53 लाख 4 हजार 120 रुपये व्याज म्हणून द्यावे लागणार आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts