SBI New FD Scheme : एसबीआय ही देशातील एक प्रमुख पब्लिक सेक्टर बँक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ही बँक देशातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. या बँकेकडून नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.
अलीकडेच या बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन एफडी स्कीम लॉन्च केली आहे. यामुळे जर तुम्ही ही एसबीआय बँकेत गुंतवणूक करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
कारण की आज आपण स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या नवीन एफडी योजनेची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ नाही दवडता जाणून घेऊया एसबीआयच्या या नवीन एफडी योजनेची सविस्तर माहिती.
एसबीआयची नवीन FD योजना
फिक्स डिपॉझिट हा अलीकडे गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार बनला आहे. अलीकडे अनेक जण फिक्स डिपॉझिट करू इच्छित आहेत. याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यांमध्ये देशातील अनेक प्रमुख बँकांनी एफडी वरील व्याजदरात मोठी वाढ केली आहे.
यामुळे एफडी करणाऱ्यांना आता चांगला परतावा मिळू लागला आहे. विविध बँकांनी गेल्या काही महिन्यांमध्ये वेगवेगळ्या योजना लॉन्च केल्या आहेत. एसबीआयने देखील नुकतीच एक नवीन एफडी योजना लॉन्च केली आहे.
या एफडी योजनेला ग्रीन एफडी म्हणून ओळखले जात आहे. देशात ग्रीन फायनान्स इकोसिस्टम विकसित करणे आणि हरित क्रियाकल्पाला वित्तपुरवठा करण्याच्या उद्देशाने, आरबीआयने ग्रीन डिपॉझिट स्वीकारण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
या अंतर्गत SBI ने ग्रीन रुपी टर्म डिपॉझिट लाँच केले आहे. एसबीआयच्या या ग्रीन एफडी स्कीम मध्ये किमान एक हजार रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते.
तसेच या योजनेत मॅक्सिमम गुंतवणुकीची कोणतीच मर्यादा ठरवण्यात आलेली नाही. म्हणजेच गुंतवणूकदार या एफ डी योजनेत त्याला हवी तेवढी अमाउंट गुंतवू शकतो.
किती व्याजदर मिळणार
एसबीआयच्या या ग्रीन एफडी योजनेत 1111 दिवस, 1777 दिवस आणि 2222 दिवसांसाठी एफडी ऑफर केली जात आहे. या अंतर्गत जर सामान्य गुंतवणूकदारांनी 1111 दिवसाच्या एफडीत गुंतवणूक केली तर त्यांना 6.65% एवढे व्याज दिले जाते तसेच जर ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 7.15% एवढे व्याज ऑफर केले जात आहे.
1777 दिवसांच्या एफडी योजनेत एसबीआयकडून सामान्य गुंतवणूकदारांना 6.65% एवढे व्याज दिले जाते आणि ज्येष्ठ नागरिकांनी यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना 7.15 टक्के एवढे व्याज ऑफर केले जात आहे. शिवाय, 2222 दिवसांच्या एफडी योजनेत सामान्य गुंतवणूकदारांना 6.40% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40% एवढे व्याज दिले जात आहे.