SBI Special FD Scheme : एसबीआय अर्थातच स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते. सोबतच बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवर चांगले व्याजदर देखील दिले जात आहे.
त्यामुळे एसबीआय मध्ये फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एसबीआय आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी योजना देखील ऑफर करते.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात अल्पकालावधीच्या एफडी योजनेत पैसे गुंतवण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची ठरणार आहे. कारण की आज आपण एसबीआयच्या 444 दिवसांच्या एफडी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआयची 444 दिवसांची एफडी योजना कशी आहे?
एसबीआय च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी अमृत वृष्टी योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना 444 दिवसांची आहे. एसबीआय अमृत वृष्टी ही नवीन योजना 15 जुलै 2024 पासून लागू झाली आहे.
योजनेत 444 दिवसांच्या ठेवींवर 7.25 टक्के वार्षिक व्याजदर मिळत आहे. याशिवाय एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देखील ऑफर करते. ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना या एफ डी योजनेत गुंतवणूक केल्यास 7.75 टक्के या दराने व्याज मिळणार आहे. या एफडीमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 3 कोटी रुपये गुंतवू शकता. आता आपण या विशेष FD योजनेत जर पाच लाख रुपये गुंतवले तर मॅच्युरिटी वर किती मिळणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
5 लाख रुपये गुंतवले तर किती रिटर्न मिळणार
जर एखाद्या सामान्य ग्राहकाने एसबीआयच्या या विशेष एफडी योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना मॅच्युरिटी वर अर्थातच 444 दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 5 लाख 44 हजार 435 रुपये रिटर्न मिळणार आहेत.
अर्थातच सामान्य ग्राहकांना 44 हजार 435 रुपये रिटर्न मिळणार आहेत. जर याच FD योजनेत सिनिअर सिटीजन ग्राहकांनी पाच लाख रुपये गुंतवले तर त्यांना पाच लाख 47 हजार 524 रुपये मिळणार आहेत. अर्थातच 47 हजार 524 रुपये हे रिटर्न म्हणून मिळणार आहेत.