SBI Vs HDFC Home Loan : एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आणि एचडीएफसी भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक. देशात फक्त 12 सरकारी बँक आहेत आणि यामध्ये एसबीआय ही सर्वात मोठी बँक म्हणून उदयास आली आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्यां इंटरेस्ट रेट वर विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते.
बँकेकडून गृह कर्ज देखील परवडणाऱ्या व्याजदरात सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे महिला कर्जदारांना अधिकची सूट देखील दिली जाते. एचडीएफसी ही प्रायव्हेट बँक देखील आपल्या ग्राहकांना एसबीआय प्रमाणेच परवडणाऱ्या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज पुरवत आहे.
दरम्यान जर तुम्हीही नजीकच्या काळात गृह कर्ज घेण्याच्या तयारीत असाल आणि कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल अशा संभ्रमात असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
कारण की, आज आपण एसबीआय आणि एचडीएफसी या दोन्ही बँकांच्या गृह कर्जाची तुलना करणार आहोत. यातून तुम्हाला कोणत्या बँकेकडून गृह कर्ज घेतल्यास तुमचा फायदा होईल याचा अंदाज बांधता येणार आहे.
एसबीआय बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना किमान 8.50% या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देत आहे. मात्र या किमान व्याजदराचा फायदा फक्त ज्या लोकांचा सिबिल स्कोर चांगला असतो त्यांनाच मिळतो.
जवळपास 800 च्या आसपास सिबिल स्कोर असणाऱ्या ग्राहकांना या किमान व्याजदरात गृहकर्ज मंजूर होऊ शकते. जर समजा एखाद्या ग्राहकाला याच किमान व्याजदरात वीस वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले तर त्या व्यक्तीला 26 हजार 35 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच त्या व्यक्तीला संपूर्ण कर्ज कालावधीमध्ये 62 लाख 48 हजार 400 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच 32 लाख 48 हजार 400 रुपये व्याज म्हणून सदर व्यक्तीला बँकेला द्यावे लागणार आहेत.
एचडीएफसी बँकेचे गृह कर्जाचे व्याजदर : प्रायव्हेट सेक्टर मधील एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना किमान 8.75 टक्के या इंटरेस्ट रेट वर गृह कर्ज उपलब्ध करून देते. जर बँकेच्या या किमान व्याज दारात एखाद्या व्यक्तीला वीस वर्ष कालावधीसाठी 30 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर झाले तर त्याला 26511 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे. म्हणजेच त्या व्यक्तीला 63 लाख 62 हजार 640 रुपये भरावे लागणार आहेत. अर्थातच 33 लाख 62 हजार 640 रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागतील.
कोणत्या बँकेचे कर्ज फायदेशीर ठरणार
वरील कॅल्क्युलेशन पाहिले असता एसबीआय बँकेचे गृह कर्ज ग्राहकांसाठी परवडणारे ठरणार आहे. तथापि गृह कर्ज घेताना वेगवेगळ्या बाबी विचारात घ्याव्या लागतात. जसे की प्रोसेसिंग फी व इतर काही छुपे चार्जेस बँकेकडून वसूल केले जाऊ शकतात.
यामुळे कर्ज घेण्याआधी बँकेकडून कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात, ते चार्जेस किती? याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊन मग तुलना करून गृह कर्ज घेणे फायदेशीर ठरणार आहे.