स्पेशल

स्वयंसहायता बचत गटांना मिळणार मिनी ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरचलीत अवजारे! ‘या’ जिल्ह्यातील बचत गटांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत करावेत अर्ज

Scheme For self-help Group:- शासनाच्या माध्यमातून अनेक महत्वाच्या अशा योजना या विविध समाज घटकांसाठी राबवल्या जातात व या योजना राबवण्यामध्ये राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचे अतिशय महत्त्वाचे अशी भूमिका असते. अगदी या अनुषंगाने जर आपण स्वयंसहायता बचत गटांचा विचार केला तर या बचत गटांसाठी देखील सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात.

यातीलच एक महत्त्वाची योजना जर बघितली तर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे पुरवण्याची योजना राबवली जाते व सध्या ही योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत आता सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक पात्र जे काही स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त,

समाज कल्याण कार्यालय सोलापूर यांच्याकडे 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त श्रीमती सुलोचना चव्हाण यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. त्यामुळे नक्कीच या योजनेचा फायदा या बचत गटांना होईल.

काय आहे या योजनेचे स्वरूप?
ही योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे स्वयंसहायता बचत गट आहेत त्यांच्यासाठी खूप फायद्याचे आहे. या योजनेचा लाभ जर बचत गटांना घ्यायचा असेल तर त्याकरिता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या या बचत गटातील जे काही सदस्य आहेत ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.

तसेच यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यातील जास्तीत जास्त सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने यांच्या खरेदीची जास्तीत जास्त मर्यादा साडेतीन लाख रुपयांपर्यंत आहे.

जेव्हा बचत गट वरील कमाल मर्यादा रकमेच्या किंवा प्रत्यक्ष यंत्रांच्या किमतीच्या दहा टक्के स्वतःचा हिस्सा भरतील त्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90% म्हणजे साधारणपणे जास्तीत जास्त तीन लाख पंधरा हजार पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. जर लाभार्थ्यांनी पावर टिलर व मिनी ट्रॅक्टर या योजनेचा लाभ जर घेतला असेल तर त्यांना पुन्हा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

तसेच एकदा या योजनेच्या माध्यमातून स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर किंवा इतर अवजारे मिळाल्यानंतर ती अवजारे किंवा ट्रॅक्टर गहाण किंवा त्यांची विक्री करता येणार नाही. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटांचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे व सदर खाते हे आधार कार्डशी संलग्न असणे गरजेचे आहे.

महत्वाचे म्हणजे स्वयंसहायता बचत गटांचे अध्यक्ष व सचिव हे अनुसूचित जाती व नव बौद्ध घटकातील असणे गरजेचे आहे. या योजनेअंतर्गत एक उद्दिष्ट असते व या उद्दिष्ट पेक्षा जर जास्त अर्ज प्राप्त झाले तर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड या माध्यमातून केली जाईल.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts