स्पेशल

Onion Market: नाफेडचा कांदा विका की आणखी काही, यावेळी कांदा शेतकऱ्यांना तारणारच! कारण की…

Onion Market:- गेल्या एक ते दोन वर्षापासून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रडवणाऱ्या कांद्याने मात्र शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा दिला असून या दृष्टिकोनातून सुरुवात केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. सध्या राज्यातील अनेक बाजार समितीमध्ये कांद्याची वाटचाल 5 हजाराकडे सुरू असल्याचे चित्र असून यावेळी नक्कीच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता दिसून येत आहे.

बाजारांमधील कांद्याचे दर कमी व्हावे किंवा स्थिर रहावेत म्हणून आता केंद्र सरकारच्या माध्यमातून स्टॉक मधला जो काही कांदा आहे तो विक्रीसाठी काढण्यात येत असून त्यामुळे कांद्याच्या बाजारभावामध्ये थोडीशी घसरण पाहायला मिळाली.

त्यामुळे साहजिकच मनात प्रश्न येतो की जर अशा पद्धतीने कांदा नाफेडच्या  माध्यमातून बाजारात आला तर त्यामुळे कांद्याचे दर उतरणार की काय? परंतु यामध्ये जर पाहिले तर कांद्याच्या भावात खूप मोठी घसरण होईल अशी शक्यता मुळीच दिसून येत नाही व त्यामागील कारणे देखील तशीच आहेत.

 कांद्याच्या दरांवर होईल का परिणाम?

सरकारच्या माध्यमातून जो काही स्टॉक मधील कांदा होता तो आता विक्रीकरिता खुल्या बाजारात काढण्यात आलेला असून यामुळे कांद्याच्या दरांमध्ये काहीशी पडझड झाली.

परंतु सत्य परिस्थिती पाहिली तर नाफेडकडे जो काही कांद्याचा स्टॉक आहे तो पूर्ण जरी विक्रीला आला तरी संपूर्ण देशात दहा दिवस पुरेल इतकाच आहे व दहा दिवस देखील पुरणार नाही. दुसऱ्या बाजूने विचार केला तर शेतकऱ्यांकडे देखील आता कांद्याचा स्टॉक खूप कमी आहे व खरीप कांद्याचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर पावसामुळे नुकसान होत असल्याने नाफेडच्या कांदा विक्रीमुळे बाजारावर खूप मोठा परिणाम होईल अशी शक्यता खूपच कमी आहे.

फक्त यामध्ये शेतकऱ्यांनी पेनिक सेलिंग टाळून टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करण्याची गरज आहे. सध्या जर आपण कांदा बाजाराचा मागोवा घेतला तर मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे चारशे रुपयांची नरमाई कांदा दरात आली असून सध्या कांद्याचे सरासरी भाव चार हजारापासून ते चार हजार तीनशे रुपये पर्यंत कमी होऊन ते तीन हजार चारशे ते तीन हजार नऊशे रुपयांपर्यंत आले.

यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफने कांदा विक्रीसाठी केंद्राची सुरुवात केली व बाजारामध्ये  पेनिक सेलिंग सुरू झाले व त्यामुळे देखील कांदा दरांवर दबाव दिसून आला असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले. तसेच देशाचा विचार केला तर मध्यप्रदेश आणि राजस्थान मधील कांद्याचे आवक ही महाराष्ट्राच्या कांद्यापेक्षा जास्त असल्याने देखील दरांवर दबाव दिसून येत आहे.

 सरकारकडे किती आहे कांद्याचा स्टॉक?

जर आपण सरकारकडे असलेल्या कांद्याचा स्टॉक बघितला तर तो पावणे पाच लाख टन असल्याचे बोलले जात आहे. परंतु याबद्दल अभ्यासकांचे म्हणणे आहे की, नाफेड आणि एनसीसीएफ कडे इतका स्टॉक नाही. यामध्ये मते मतांतरे असून काहींच्या मते नाफेड आणि एनसीसीएफ कडे  तिथे साडेतीन लाख टनांचा स्टॉक आहे तर काहींच्या मते अडीच लाख टनापेक्षा जास्त स्टॉक नाही.

त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफकडे नेमका किती कांद्याचा स्टॉक आहे हा एक मुळात प्रश्न आहे. परंतु जर सरकारकडे पावणे पाच लाख टन कांदा असेल आणि सरकारने जर त्याची किरकोळ विक्री केली तर भारताला दररोज 50 ते 55 हजार टन कांदा वापरासाठी लागतो. या हिशोबाने बघितले तर सरकारकडे पावणे पाच लाख टन कांदा स्टॉक असेल तरी देखील तो देशाला दहा दिवस देखील पुरणार नाही.

 कांद्याचे दरात वाढ होण्यामागील कारणे

जर आपण कांदा बाजारभावातील वाढ पाहिली तर त्या मागील प्रमुख कारण म्हणजे बाजारांमध्ये सध्या कांद्याची आवक खूप कमी झालेली आहे आणि यावर्षी कांद्याचे उत्पादन घटले होते व उपलब्ध स्टॉक देखील कमी आहे. पूर्ण देशांमध्ये कांद्याचा सरासरी स्टॉक खूप कमी असून मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील स्टॉक 20 टक्क्यांपर्यंत असल्याचे बोलले जात आहे.

परंतु महाराष्ट्र मध्ये कांद्याचा स्टॉक काहीसा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. परंतु दरवर्षीपेक्षा तो तुलनेने खूपच कमी आहे. शेतकऱ्यांकडे पुढील दोन ते तीन आठवडे पर्यंत बऱ्यापैकी स्टॉक राहिल व त्यानंतर तो कमी होईल.शेतकऱ्यांनी कांदा विक्री केल्यामुळे तो व्यापाऱ्यांच्या हातात जाईल.

या सगळ्या परिस्थितीमध्ये नाफेडने कांद्याची विक्री केली तरी त्याचा परिणाम काही दिवसांपुरताच होण्याची शक्यता आहे व त्यामुळे कांदा बाजारात मंदी येईल असे चित्र नसल्याचे देखील जाणकारांनी म्हटले.

 जाणकारांनी दिला शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला

या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कांद्याचे पॅनिक सेलिंग टाळणे गरजेचे आहे व टप्प्याटप्प्याने बाजाराचा अंदाज घेऊन कांदा विक्री केला तर फायद्याचे ठरू शकते असे जाणकारांनी म्हटले.

कांदा दरामध्ये थोडेफार चढउतार होऊ शकतात परंतु शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून टप्प्याटप्प्याने येत्या दिवाळीपर्यंत जर कांदा विक्रीचे उत्तम नियोजन केले तर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो असे देखील जाणकारांनी म्हटले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts