स्पेशल

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ स्टॉकने 74 हजाराचे बनवलेत 1 कोटी, पहा कोणता आहे तो स्टॉक?

Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट म्हणजेच शेअर बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार जर त्यांनी गुंतवणूक केलेल्या कंपनीने चांगली कामगिरी केली तर लाखो रुपयांचा परतावा मिळवतात. शेअर मार्केट मधील गुंतवणूकदार लखपती बनतात.

मात्र अनेकदा गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये नुकसान देखील सहन करावे लागते. परंतु जर योग्य अभ्यास करून, वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन योग्य स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर अनेक लोकांना शेअर मार्केट मधून करोडो रुपयाचा परतावा देखील मिळाला आहे.

मात्र यासाठी गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करावी लागते. निश्चितच काही शेअर अल्प कालावधीत देखील गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात.

हे पण वाचा :- पुणे जिल्ह्याचे विभाजन होणार? ‘या’ 8 तालुक्याचा तयार होणार नवीन शिवनेरी जिल्हा, तालुक्याची आणि गावांची यादी पहा एका क्लिकवर

पण शेअर मार्केट मध्ये लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करण्यावरच लोकांचा मदार असतो आणि यातून त्यांना चांगले रिटर्न देखील मिळतात. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉक संदर्भात सांगून घेणार आहोत ज्या स्टॉकने आपला गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये करोडो रुपयांचा परतावा दिला आहे.

शेअर मार्केट मधील एका स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वीस वर्षांच्या कालावधीत तब्बल 74 हजाराच्या बदल्यात एक करोड रुपयांचा रिटर्न दिला आहे. निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात जाणून घ्यायचं असेल चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हे पण वाचा :- रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ रिक्त पदांसाठी निघाली मोठी भरती; आजच इथं करा अर्ज

कोणता आहे तो स्टॉक

अॅब्रेसिव्ह आणि सिलिकॉन कार्बाइड उत्पादक आणि निर्यातक ग्राइंडवेल नॉर्टन या स्टॉकने ही चांगली कामगिरी केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 23 मे 2003 रोजी ग्रिंडवेल नॉर्टनचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 14.61 रुपयावर ट्रेड करत होता. आता या स्टॉक ची किंमत ही 1976.75 रुपये एवढी झाली आहे.

म्हणजेच 20 वर्षांच्या कालावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकित जवळपास 13,430 टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 20 वर्षांपूर्वी अर्थातच 2003 मध्ये या स्टॉकमध्ये विश्वास दाखवून फक्त 74,000 रुपये गुंतवले असतील आणि गुंतवणूक केलेली ही रक्कम आत्तापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर आज ही गुंतवणूक जवळपास एक कोटी रुपयांची बनली असेल.

हे पण वाचा :- धक्कादायक ! राज्यातील ‘या’ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 2 महिन्याचे वेतन रखडले; कारण काय? वाचा…

एकंदरीत या स्टॉकने लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगलेच मालामाल बनवले आहे. फक्त एका वर्षाचा विचार केला तर हा स्टॉक सुमारे 16 टक्के वाढला आहे. तसेच 2023 मध्ये, याने गुंतवणूकदारांना सुमारे 8 टक्के परतावा दिला असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

विशेष म्हणजे हा स्टॉक गेल्या पाच वर्षांत 287% वाढला आहे. एकंदरीत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात चांगला परतावा देण्याचे काम केले आहे.

मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही केवळ स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी सर्वप्रथम आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना कांदा अनुदान केव्हा मिळणार? कुठवर आली कांदा अनुदानाची प्रक्रिया? पहा…

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts