स्पेशल

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी; ‘हा’ शेअर लवकरच आकाशाला गवसणी घालणार, मिळणार 74% रिटर्न; तज्ज्ञांचा अंदाज, पहा…..

Share Market News : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक मोठी महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेले काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या धोरणांमुळे काही शेअर्स प्रकाश झोतात आले आहेत. यामध्ये गॅस कंपन्यांच्या शेअर्सचा देखील समावेश आहे. विशेषतः सीएनजी आणि पीएनजी गॅस कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आले असून यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

या शेअर्स मध्ये गुंतवणूकदार आता जोखीम घेण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. दरम्यान अशाच एका गॅस कंपनीच्या शेअर्स बाबत एका ब्रोकरेज फर्मने मोठा दावा केला आहे. व्हेंचुरा या देशातील एका प्रमुख ब्रोकरेज फर्मने असा दावा केला आहे की, महानगर गॅसचे शेअर्स पुढील दोन वर्षात 74 टक्के इतका परतावा देणार आहेत.

हे पण वाचा :- काय सांगता ! ‘या’ मुख्यमंत्र्यांकडे आहे सर्वात जास्त पैसा; महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांकडे किती कोटी, पहा कोट्याधीश मुख्यमंत्र्यांची यादी

या ब्रोकरेज फर्म ने दिलेल्या माहितीनुसार हा शेअर्स पुढील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये 1719 पर्यंत जाणार आहे. म्हणजेच ही किंमत आत्ताच्या या शेअरच्या किमतीपेक्षा 74% अधिक आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या महानगर गॅसचे शेअर्स हे 992.90 रुपयांवर आले आहेत.

विशेष बाब अशी की हा शेअर्स वाढीसह ट्रेड करत आहे. म्हणजे या शेअर्समध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 17.48% वाढ नमूद करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

तसेच गेल्या एका वर्षात, या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना सुमारे 21.63% परतावा दिला आहे. अशातच आता देशातील प्रमुख ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने या शेअर्समध्ये अभूतपूर्व वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

यामुळे या फर्मचा हा अंदाज जर खरा ठरला तर या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार लवकरच मालामाल होतील यात शँका नाही. निश्चितच जर या शेअरने पुढील दोन वर्षात 74% इतका रिटर्न गुंतवणूकदारांना दिला तर या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची या शेअरमुळे चांदी होऊ शकते.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता 10 ते 15 दिवसांत मिळणार कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, ही कागदपत्रे तयार ठेवा, पहा…..

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts