शेअर मार्केट नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तेजीत आले, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नववर्षाच्या अगदी सुरुवातीलाच उत्साहाचे वातावरण आहे. 1 जानेवारी 2025 रोजी दिवसभरातील घडामोडीनंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच बीएसई सेन्सेक्स 368.40 अंकांनी वाढून 78,507.41 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 98.10 अंकांनी वाढून 23,742.90 अंकांवर पोहोचला होता. दरम्यान, काल एक पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतानाच अनेकांच्या नजरेत आला.
मंडळी, शेअर मार्केटमध्ये लिस्टेड असणारे काही पेनी स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. यामुळे अनेकजण पेनी स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करतात. किंमत कमी असणारे शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी करून अनेकजण चांगला परतावा कमावतात. पण अशा स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करणे हे जोखीमपूर्ण देखील असते. यामुळे संबंधित स्टॉकचा आणि कंपनीचा संपूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करायला हवी.
दरम्यान, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा पेनी शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये आला आहे. खरे तर या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षांमध्ये ८४० टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. म्हणून आज आपण या स्टॉकची सध्याची स्थिती, गेल्या पाच वर्षातील या स्टॉकची बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वरील कामगिरी आणि ही कंपनी नेमकी काय काम करते ? याबाबतचा संपूर्ण आढावा घेणार आहोत.
मंडळी, मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची गेल्या काही वर्षांची कामगिरी जाणून घेण्याअगोदर आपण या शेअरची सध्याची स्थिती पाहुयात. हा स्टॉक नववर्षाच्या पहिल्या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर तेजीत राहिला. बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअर 1.64 टक्क्यांनी वाढून 1.80 रुपयांवर पोहोचला होता. पण, मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 2.42 रुपये होता, तर मोनोटाइप इंडिया लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 0.54 रुपये होता. मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे एकूण 127 कोटी रुपये एवढे आहे. आता आपण मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची गेल्या एका वर्षातील प्राईस रेंज जाणून घेऊयात.
मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरची प्राईस रेंज कशी आहे?
मोनोटाइप इंडिया लिमिटेड स्टॉकची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 1.83 रुपये होती. पण बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनीचा स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 1.80 ते 1.80 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. तसेच गेल्या 1 वर्षात मोनोटाइप इंडिया लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडींग रेंज 0.54 पैसे ते 2.42 रुपयांच्या दरम्यान राहिली आहे. म्हणजे या स्टॉक मध्ये केल्या एका वर्षात मोठ्या प्रमाणात चढ-उतार राहिले आहेत. यातून काही गुंतवणूकदारांना चांगली कमाई झाली आहे तर काही गुंतवणूकदारांचे नुकसान सुद्धा झाले आहे. आता या स्टॉकची गेल्या पाच वर्षातील कामगिरी नेमकी कशी राहिली? याचा आढावा घेऊयात.
मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने किती परतावा दिला?
मंडळी, मागील ६ महिन्यात मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 83.67% एवढा परतावा दिला आहे. तर, मागील १ वर्षात या शेअरने 140% एवढा परतावा दिला आहे. मागील ५ वर्षाचा विचार केला असता मोनोटाइप इंडिया कंपनी शेअरने 847.37% परतावा दिला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी तोट्याचा राहिलाय, मोनोटाइप इंडिया शेअर लॉंग टर्ममध्ये 64% घसरला आहे. आता आपण ही कंपनी नेमकी काय काम करते याबाबत माहिती पाहुयात.
कंपनी काय काम करते?
ही कंपनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग आणि वित्तीय सेवांशी संबंधित व्यवसाय करते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, तिचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 111.80 कोटी रुपये आहे. बीएसईच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 25.33 कोटी रुपये होता आणि निव्वळ नफा 2.99 कोटी रुपये होता. तर जूनच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीचा महसूल केवळ 2.68 कोटी रुपये होता. तसेच नफाही 2.06 कोटी रुपये होता. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे सध्या स्थितीला 127 कोटी रुपये एवढे आहे.