Share Market Tips : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची ही बातमी विशेष खास आहे. खरं पाहता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक करावी जेणेकरून चांगला परतावा मिळेल असा सल्ला दिला जातो. निश्चितच हा एक महत्त्वाचा आणि गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणारा सल्ला आहे.
मात्र शेअर मार्केट हे अनिश्चिततेने परिपूर्ण आहे. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांना अनेकदा लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करून देखील फारसा फायदा होत नाही. तर अनेकदा असं देखील आढळून आल आहे की कमी कालावधीतच काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.
हे पण वाचा :- CBSE 12वी चे निकाल लागले; महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी अन 12वीचे निकाल केव्हा? पहा डिटेल्स
दरम्यान, आज आपण अशाच एका स्टॉक संदर्भात जाणून घेणार आहोत ज्याने मात्र एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल सहा पट परतावा देण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच दिवसांपासून या स्टॉकला अप्पर सर्किट लागले आहे आणि या पाच दिवसात या स्टॉकमध्ये 20 टक्क्यांची वाढ नमूद करण्यात आली आहे. आता निश्चितच तुम्हाला या स्टॉक संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता वाढली असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या स्टॉक विषयी सविस्तर माहिती एका क्लिकवर.
कोणता आहे तो स्टॉक
हा स्टॉक आहे जीआय इंजीनियरिंग सोल्युशन्स लिमिटेडचा. याच स्टॉकने गेल्या एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना सहापट अधिक परतावा दिला आहे. म्हणजे जर या स्टॉक मध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्यावर्षी एक लाख रुपयाची गुंतवणूक करून ती गुंतवणूक आतापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा गुंतवणूकदारांना तब्बल सहा लाख रुपयाचा परतावा मिळाला असेल. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसात या स्टॉकने 100% हुन अधिकचा परतावा देण्याचा भीम पराक्रम देखील केला आहे.
हे पण वाचा :- मुली वडिलांच्या मालमत्तेवर केव्हा दावा करू शकतात? कायदा सांगतो की….
हाती आलेल्या एका आकडेवारीनुसार, 20 फेब्रुवारी 2023 रोजी हा शेअर 5 रुपये आणि 30 पैशांवर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर ट्रेड करत होता. आणि काल तो 23 रुपये 75 पैशांवर बंद झाला आहे. गेल्या 15 दिवसांतच या शेअरने 11 रुपयांवरून 22.65 रुपयांपर्यंत मजल मारली आहे. या स्टॉकने एका महिन्यात तब्बल 137% परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे. एकंदरीत या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची कमी दिवसातच चांदी झाली आहे.
मित्रांनो, येथे दिलेली माहिती ही स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात असते. ही माहिती कोणत्याही गुंतवणुकीचा सल्ला नाही याची नोंद घ्यायची आहे. शेअर मार्केट हे जोखीमेने परिपूर्ण आहे यामुळे येथे गुंतवणूक करताना काळजी घेणे अपेक्षित असून आपल्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेणे जरुरीचे आहे.
हे पण वाचा :- यंदाच्या हंगामात सोयाबीन पिकातून विक्रमी उत्पादन मिळवायचे ना ! मग पेरणीपूर्वी ‘हे’ महत्वाचं काम कराच, वाचा….