Share Market Tips : देशात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
शेअर बाजारातील काही स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीतच चांगला लाभ देत असल्याने अलीकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
मात्र असे असले तरी गुंतवणूकदारांना नेहमी लॉन्ग टर्म मध्ये इन्वेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला बंपर परतावा मिळतो. अनेक ब्रोकरेज फर्म देखील या गोष्टीला दुजोरा देतात.
परंतु शेअर बाजारात असेही काही शेअर्स आहेत जे कमी कालावधीमध्ये देखील बंपर परतावा देण्यासाठी ओळखले जात आहेत. आज आपण अशाच एका शेअर संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना केवळ तीन वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल 1100% रिटर्न देण्याची किमया साधली आहे.
आज आपण अशा एका शेअरची माहिती जाणून घेणार आहोत जो तीन वर्षांपूर्वी 37 रुपयांवर ट्रेड करत होता मात्र आता तब्बल 490 रुपयांवर ट्रेड करत आहे.
निश्चितच आता तुम्हाला या स्टॉक संदर्भात जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल. चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता या स्टॉक संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
हे पण वाचा :- दहावी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी मोठी भरती, अर्ज कसा करणार, वाचा
कोणता आहे तो स्टॉक
हा स्टॉक आहे बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड कंपनीचा. आम्ही आपणास सांगू इच्छितो की ही एक सोलर ग्लास तयार करणारी कंपनी आहे. गेल्या तीन वर्षात या कंपनीच्या शहर ने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 1100 टक्के रिटर्न दिले आहे.
अर्थातच या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या तीन वर्षात मालामाल बनले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा मिडीयम कॅपिटल कंपनीचा स्टॉक एप्रिल 2020 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर 37 रुपये आणि 55 पैशांवर ट्रेड करत होता.
हे पण वाचा :- मुंबई ते नागपूर प्रवास होणार गतिमान! ‘या’ तारखेपासून सुरू होणार Mumbai-Nagpur अतिरिक्त विमानसेवा, तिकीटही राहणार कमी, पहा….
आता मे 2023 मध्ये हा शेअर 496 रुपयांपर्यंत पोहचला आहे. 25 एप्रिल 2023 रोजी हा शेअर 52 आठवड्यातील उच्चांकी पातळीवर, 833 रुपयांवर पोहोचला होता. आणि 28 मार्च 2023 ला हा शेअर 52 आठवड्यातील निच्चांक 380.05 रुपयावर ट्रेड करत होता.
मित्रांनो आम्ही येथे फक्त स्टॉकच्या परफॉर्मन्स संदर्भात माहिती देत असतो. ही माहिती कोणत्याही परिस्थितीत गुंतवणुकीचा सल्ला राहणार नाही याची नोंद वाचक मित्रांनी घ्यायची आहे.
हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! आरोग्य विभागात मोठी भरती; ‘या’ पदाच्या 4751 पदे भरली जाणार, वाचा सविस्तर