Shetkari Karj Mafi : शिंदे फडणवीस सरकारने सत्ता स्थापन केल्यानंतर अनेक मोठमोठे निर्णय घेतले आहेत. यापैकीच एक निर्णय आहे भूविकास बँकेच्या कर्जमाफीचा. सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम शिंदे सरकारने भूविकास बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शासनाकडून निर्णय निर्गमित झाला खरी मात्र भूविकास बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांचे सातबारा हा निल झालेला नव्हता.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना इतर ठिकाणाहून कर्ज घेताना अडचणी येत होत्या. दरम्यान आता शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा कोरा करण्यासंदर्भात आदेश निर्गमित झाले आहेत. त्यामुळे यासंबंधीत शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील भूविकास बँकेच्या थकबाकी असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांचे सातबारे आता कोरे होणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यात 547 वैयक्तिक शेतकऱ्यांकडे भूविकास बँकेची थकबाकी होती. शिवाय पाच सहकारी संस्थांकडे देखील थकबाकी बँकेची होती. या वैयक्तिक शेतकऱ्यांची आणि सहकारी संस्थांची तब्बल दहा कोटी 52 लाख 91 हजार 541 कर्जमाफी शासनाकडून करण्यात आली आहे.
दरम्यान शासनाच्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली आहे. शिवाय आता शासनाकडून संबंधित शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्याचे आदेश निर्गमित झाले आहेत. यानुसार जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून 6 मार्च 2023 रोजी एक महत्त्वाचा आदेश जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांना निर्गमित करण्यात आला आहे.
हे पण वाचा :- कांदा सानुग्रह अनुदानाबाबत महत्त्वाची बातमी; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार रक्कम, मंत्री भुसेंनी थेट तारीखच…
जिल्हाधिकारी महोदय यांनी या संबंधित शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता या सर्व संबंधित शेतकरी बांधवाना तालुका तहसीलदार आणि सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था डॉ. सोपान शिंदे यांनी संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की जिल्ह्यातील, रत्नागिरी तालुक्यातील ५३, राजापूर तालुक्यातील १३१, मंडणगड तालुक्यातील ६४, गुहागर तालुक्यातील ६६, दापोली तालुक्यातील ३२, देवरुख तालुक्यातील २५, लांजा तालुक्यातील ४७, चिपळूण तालुक्यातील ५७, खेड तालुक्यातील ७५ शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
हे पण वाचा :- आता नवीन वाद पेटणार ! समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात 1000 कोटींचा घोटाळा?; राज्यात एकच खळखळ