Shikshak Bharati 2023 : शिक्षक भरती संदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. 2017 पासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण की आता महाराष्ट्रात लवकरच तीस हजार शिक्षकांची भरती होणार आहे.
याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहिती दिली आहे. मंत्री महोदय यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यात 30000 शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ही भरती राबवली जाणार आहे.
हे पण वाचा :- महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा
शिक्षक भरती संदर्भात गुरुवारी विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार, दिलीप वळसे पाटील, समवेतच इत्यादी विरोधी पक्षातील विधानसभा सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती संदर्भात ही मोठी माहिती दिली आहे.
केसरकर यांनी सांगितले की, कोरोनामुळे गेल्या काही काळापासून राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. निश्चितच गेल्या काही वर्षांपासून शिक्षक भरतीची उमेदवारांकडून आतुरतेने वाट पाहिली जात आहे. मात्र आता फेब्रुवारी ते मार्च 2023 या काळात टीईटी म्हणजेच टेंट परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
हे पण वाचा :- सावधान ! विजांच्या कडकडाटासह राज्यात पावसाची शक्यता; ‘या’ एप्लीकेशनचा वापर करण्याचा शेतकऱ्यांना सल्ला
या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाकडून आता 30000 रिक्त शिक्षकांची पदे भरली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता टेट परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहे. सध्या, 30000 पैकी 80 टक्के पदे भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित पदभरती साठी देखील लवकरच परवानगी शासनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करून इच्छितो की 2017 मध्ये टेट परीक्षा आयोजित झाली होती. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी ही परीक्षा आता शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आयोजित होणार आहे. यामुळे राज्यातील लाखो शिक्षक भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे.
दरम्यान राज्यातीलं अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे राज्य शासनाने धोरण आखले आहे. याबाबतही केसरकर यांनी विधानसभेत माहिती दिली तसेच टेंट परीक्षा मध्ये घोटाळा प्रकरणी दोषी ठरलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
हे पण वाचा :- शेतकरी पुत्रांची फिनिक्स भरारी ! आपल्या कौशल्याच्या जोरावर मिळवलं 18 लाखांच पॅकेज