Shirdi News : करोडो भाविकांचे श्रद्धास्थान अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी जगभरातील भाविक येतात. दररोज शिर्डी मध्ये हजारो लोकांची गर्दी असते. सणासुदीच्या दिवसांमध्ये अन सुट्ट्यांच्या कालावधीत तर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते.
वर्ष एंडिंगला देखील ही गर्दी वाढत असते. दरम्यान जर तुम्हीही येत्या 20 तारखेला साईनगरी शिर्डी येथे बाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर थांबा! दर्शनाला निघण्याआधी आजची ही बातमी पूर्ण वाचा. मिळालेल्या माहितीनुसार, 20 डिसेंबर 2024 रोजी साईनगरी शिर्डी येथील मंदिर काही तास भाविकांकरिता बंद राहणार आहे.
20 डिसेंबरला दुपारी पावणे दोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. मंदिर समिती प्रशासनाच्या माध्यमातूनच ही माहिती समोर आली आहे. यामुळे जर तुमचाही या दिवशी दर्शनासाठी जायचा प्लॅन असेल तर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाची दखल घेऊनच तुम्ही तुमच्या दर्शनासाठीची वेळ ठरवा.
अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान आता आपण वीस तारखेला जवळपास तीन तास दर्शनासाठी मंदिर बंद का राहणार आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दर्शनासाठी मंदिर बंद का राहणार?
20 तारखेला श्रीक्षेत्र शिर्डी येथील साई समाधी मंदिरातील साईंच्या संगमरवरी मूर्तीची भविष्यात हुबेहूब प्रतिकृती तयार करता यावी, तसेच तब्बल 70 वर्षांपूर्वी इटालियन मार्बलमध्ये घडवण्यात आलेल्या या मूर्तीची सद्यस्थिती काय आहे, याचा अंदाज यावा, यासाठी साई मूर्तीचं 3D स्कॅनिंग केलं जाणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आलेली तज्ज्ञांची समिती हे काम करणार आहे.
वीस तारखेला ही समिती मंदिराला भेट देणार असून दुपारी पावणेदोन वाजेपासून ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे या काळात मंदिर सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनाकरिता बंद राहणार आहे. वीस तारखेला मंदिर तीन तास बंद राहणार याची नोंद भाविकांनी घ्यायची आहे.
मंदिरात काय काम केले जाणार ?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईवरून येणाऱ्या विशेष समितीच्या माध्यमातून साईबाबांच्या मूर्तीची 360 अंशांच्या कोनातून चोहोबाजूंनी फोटोग्राफी केली जाणार आहे. या फोटोग्राफीचे नंतर डिजिटल स्वरूपात मॉडेल तयार केले जाणार आहे. हिच प्रक्रिया थ्रीडी स्कॅनिंग म्हणून ओळखली जाते.
थ्रीडी स्कॅनिंग म्हणजे डिजिटल वातावरणात मूर्तीच्या भूमितीची अचूकता टिपणे. थ्रीडी स्कॅनिंग हे वस्तू किंवा वातावरणाचं विश्लेषण करून वस्तूच्या आकाराचा, शक्यतो त्याच्या स्वरूपाचा (उदा. रंग) त्रिमितीय डेटा गोळा करण्याची प्रक्रिया आहे. संकलित डेटा नंतर डिजिटल थ्रीडी मॉडेल तयार करण्यासाठी वापरला जातो.