अहमदनगर Live24 / नागपूर :- शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा ७९ वर गेला असून त्यापैकी ४४ जणांना एकाच व्यक्तीमुुळे लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा सामुदायिक संसर्ग कसा होऊ शकतो यावर महापालिकेनेच प्रकाश टाकला आहे. दरम्यान, नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये सोमवारी आणखी ७ जणांची भर पडली.
आतापर्यंत १२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. एका व्यक्तीमुळे किमान ४०६ लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, असा अभ्यास अलीकडेच प्रकाशित झाला आहे.
त्याचा प्रत्ययच नागपुरात येत असून नागपूर महानगरपालिकेने अधिकृतरीत्या या धक्कादायक प्रकारावर प्रकाश टाकणारा आलेखच जारी केला आहे. सतरंजीपुरा परिसरातील ६८ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा ५ एप्रिल रोजी मृत्यू झाला.
तत्पूर्वी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यावर महापालिका प्रशासनाने त्याच्या कुटुंबातील तीन मुली, मुलगा, जावई, सुना, नातवंडे अशा २२ जणांची तातडीने विलगीकरण कक्षात रवानगी केली होती.
६८ वर्षीय व्यक्ती आजारी असताना आजारपणात त्याला भेटण्यासाठी अनेक नातेवाईक आणि शेजारी आले होते. त्यापैकी जवळपास १३ जण पॉझिटिव्ह आढळले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®