स्पेशल

देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांचे मोठे विधान ! 2019 मध्ये….

Shrigonda MLA Vikram Pachpute : 2019 च्या निवडणूक निकालानंतर जे झालं त्याचेच रिएक्शन 2024 च्या निकालात दिसलं असं विधान श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे. काल भारतीय जनता पक्षाने आपल्या गट नेत्याची निवड केली. पक्षाने सर्वानुमते देवेंद्र सरितादेवी गंगाधरराव फडणवीस यांची आपला गटनेता म्हणून निवड केली.

यावेळी मुंबईत भाजपाचे सर्व नवनिर्वाचित आमदार हजर होते. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर विक्रम पाचपुते हे पत्रकारांशी बोलत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीला बहुमत दिले होते.

मात्र मुख्यमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले. यामुळे शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला आणि अनेक वर्षांपासूनची शिवसेना अन भाजप यांच्यातील युती संपली. पुढे राज्यात अनेक मोठमोठ्या घडामोडी झाल्यात.

भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांना सोबत घेत सत्तास्थापनेचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पण, नंतर शरद पवार यांनी भाकरी फिरवत अजित पवार यांना परत बोलावले.

यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडी सरकार मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतरच्या काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडलेत.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समवेत आलेल्या चाळीस हुन अधिक आमदारांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला अन राज्यात महायुतीचे सरकार आले. बीजेपीने मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांना बसवले. पुढे या सरकारमध्ये अजित पवार गटही सामील झाला.

दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांनी महायुती म्हणून निवडणूक लढवली आणि राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. राज्याच्या इतिहासात आत्तापर्यंत कोणत्याच युतीला एवढा मोठा जनादेश मिळाला नव्हता एवढा जनादेश महायुतीला मिळाला.

भारतीय जनता पक्षाला तब्बल 132 जागा मिळाल्यात. दरम्यान, आज अर्थातच पाच डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.

याच संदर्भात भाष्य करताना श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईत बोलताना पाचपुते यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 च्या दरम्यान खूपच उत्कृष्ट काम केले होते.

त्यामुळे 2019 मध्ये देखील जनतेने युतीला चांगले बहुमत दिले होते. मात्र दुर्भाग्य होते की, त्यावेळी आमचे सरकार बनू शकले नाही. पण 2019 च्या निवडणूक निकालानंतर जे झालं त्याचेच रिएक्शन 2024 च्या निकालात दिसलं, अशी प्रतिक्रिया पाचपुते यांनी दिली आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts