स्पेशल

Snake In World: ‘हे’ आहेत जगातील सर्वात लांब आणि वजनदार साप! काही सापांचे वजन आहे 250 किलोपर्यंत, वाचा माहिती

Snake In World:- जगामध्ये मोठ्या प्रमाणात सापांच्या जाती असून प्रत्येक जातीचे वैशिष्ट्य देखील वेगवेगळे आणि आश्चर्यकारक असे आहे. यामध्ये कित्येक जाती बिनविषारी आहेत तर कित्येक विषारी देखील आहेत. सापांचे एक आकर्षक असे जग आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

यामध्ये जर आपण काही साप पाहिले तर त्यांची लांबी आणि वजन जर पाहिले तर त्याच्यावर विश्वास बसणार नाही असे आहे. असे लांबीने आणि वजनाने महाकाय असलेले साप आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये दिसून येतात.

जगाच्या दक्षिण अमेरिकेच्या घनदाट जंगलांपासून ते आफ्रिकेच्या बऱ्याच भागात  आपल्याला हे महाकाय साप दिसून येतात. अशाच प्रकारे काही वजनाने आणि लांबीने मोठे असलेल्या सापांची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 हे आहे जगातील वजनाने लांबीने महाकाय असे साप

1- ग्रीन

ॲनाकोंडा हा जगातील सर्वात वजनदार साप असून तो दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन बेसनाच्या दलदलीत आणि नद्यांमध्ये आढळतो. या महाकाय सापाचे वजन 250 किलो व लांबी नऊ मीटर म्हणजेच 30 फुटांपेक्षा जास्त आहे.

जर आपण ग्रीन ॲनाकोंडाचा आहार पाहिला तर प्रामुख्याने मासे असेच पक्षी व इतर सस्तन प्राणी यांचा यामध्ये समावेश होतो. हे साप बिनविषारी असतात व ते त्यांच्या शक्तिशाली शरीराचा वापर करून त्यांचे शिकार करतात व गिळण्यापूर्वी त्याचा श्वास गुदमरतात.

2- जाळीदार अजगर जाळीदार अजगर हा जगातील सर्वात लांब साप असून तो आग्नेय आशियामध्ये आढळून येतो. या अजगराची लांबी 33 फूट म्हणजेच दहा मीटर पर्यंत देखील आहे.

या जातीचा अजगर प्रामुख्याने फिलिपाईन्स तसेच इंडोनेशिया आणि मलेशिया सारख्या देशातील वनांमध्ये तसेच गवताळ प्रदेशात दिसून येतात. या जातीचा साप पक्षी आणि इतर सस्तन प्राण्यांचा विविध प्राण्यांचे शिकार करतात.

3- बर्मीज अजगर या जातीच्या अजगराची लांबी आणि वजन पाहिले तर ते देखील आश्चर्यकारक असे आहे. या अजगराची लांबी 23 फूट आणि वजन 90 kg पेक्षा जास्त असू शकते.

या जातीचा साप म्यानमार तसेच थायलंड आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये असलेल्या गवताळ प्रदेश तसेच दलदल आणि जंगलांमध्ये आढळतो.  या प्रकारच्या अजगराचे  वैशिष्ट्य म्हणजे ते पाळीव प्राण्यांप्रमाणे आपल्याला ठेवता येतात. त्यांना बंदिस्त ठेवल्यास देखील ते धोकादायक नसतात.

4- रॉक पायथन हा आफ्रिकेतील सर्वात मोठा साप असून त्याची लांबी 25 फुटांपर्यंत लांब आहे. हा आफ्रिकेमध्ये आढळून येतो. तसेच आफ्रिकेतील जंगले तसेच खडकाळ भागांचे विविध वातावरणामध्ये राहतात.

या जातीचा अजगर त्याच्या आक्रमक स्वभावासाठी आणि मानवांवर हल्ला करण्यासाठी प्रामुख्याने ओळखला जातो. या प्रकारचा अजगर हा हरीण तसेच माकड आणि मगरींचा व विविध प्राण्यांचे शिकार करतात.

5- भारतीय अजगर हा सापांचा जगातील एक असा प्रकार असून याची लांबी वीस फुटांपर्यंत आहे. हा भारतीय उपखंडातील जंगले तसेच गवताळ प्रदेश आणि दलदलीत आढळून येतो.

भारतीय अजगर बिनविषारी असून ते लहान पक्षी आणि लहान प्राण्यांची शिकार करतात. अजगराच्या या प्रकाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्यामध्ये उत्तम प्रकारे पोहू शकतो.

6- पिवळा ॲनाकोंडा पिवळा अनाकोंडा हा ग्रीन म्हणजे हिरव्या ॲनाकोंडापेक्षा लहान असून जगातील सर्वात मोठ्या सापांमध्ये त्याची तरी देखील गणना केली जाते. या जातीचा अजगर अमेरिकेतील दलदल आणि नद्यांमध्ये आढळून येतो.

या अजगराची लांबी पंधरा फुटांपर्यंत असते व वजन 55 किलोपेक्षा जास्त असू शकते. पिवळा ॲनाकोंडा बिनविषारी असतात तसेच ते खाद्य म्हणून मासे व पक्षी तसेच लहान प्राण्यांची शिकार करतात. या जातीचे साप अंडी न देता पिल्लांना जन्म देतात व एकावेळी सरासरी 24 पिल्लांना जन्म देतात.

 हा आहे जगातील सर्वात लहान साप

ज्याप्रमाणे आपण जगातील सर्वात महाकाय असे साप बघितले. अगदी त्याचप्रमाणे जगातील सर्वात लहान साप देखील आहे व त्याचे नाव आहे बार्बाडोस  थ्रेडस्नेक हे होय. हा एक 2018 मध्ये सापडलेला सर्वात छोटा प्रकारचा साप आहे. हा बार्बाडोस आणि अँगुइला या कॅरिबियन बेटांवर आढळून येतो व त्याची लांबी फक्त दहा सेंटीमीटर इतकी आहे. हा साप इतका लहान आहे की तो युएस डॉलरच्या नाण्यावर आरामात बसू शकतो. सापाचे ही जात वाळवी आणि मुंग्या व छोट्या अळ्या खातात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts