स्पेशल

Snake Information: साप जोराने हिस्स्स्स आवाज काढतो पण का? आपल्याला काय इशारा देत असतो साप? वाचा माहिती

Snake Information:- माणूस असो किंवा कोणताही वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी आणि किड्यांपासून प्रत्येकाला जर समोर काही जीवाला धोका दिसत असेल तर काही वेगवेगळ्या प्रकारची रिएक्शन देतात. कारण बऱ्याचदा अशा रिएक्शन नंतर समोरचा प्राणी व्यक्तीवर स्वतःचा जीव वाचवण्याकरिता हल्ला करू शकतो.

अगदी याच पद्धतीने जर आपण सापाचा विचार केला तर आपल्यापैकी प्रत्येक जण सापाला घाबरत असेल. आपल्या समोर नुसता साप दिसला तरी काळजात धस्स होते. तोंडाचे पाणी पडते व आपली त्रेधातिरपीट उडते. परंतु साप देखील जेव्हा त्याला जीवाला धोका वाटतो तेव्हा इतरांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी काही आवाज काढतो किंवा रिॲक्शन देतो व त्यातच एक महत्त्वाची रिएक्शन म्हणजे साप हिस्स्स असा आवाज काढतो.

जर आपण या आवाजाचा विचार केला तर तो त्याचे स्वतःचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून हा आवाज काढत असतो व जेव्हा त्याला स्वतःच्या जीवावर काहीतरी बेतेल किंवा जीवावर संकट आहे असे जेव्हा वाटते तेव्हाच तो या पद्धतीचा आवाज काढत असतो.

 याबाबतीत काय म्हणतात तज्ञ?

याबाबतीत जर आपण तज्ञांचा विचार केला तर अनेक सापांच्या बाबतीत अभ्यास व संशोधन करणारे तज्ञांचे मत आहे की इतर प्राण्यांप्रमाणे सापांना देखील जर समोर धोका दिसला तर स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न ते करतात व यासाठी ते अतिशय वेगाने बिळात शिरतात किंवा कुठेतरी लपण्याचा प्रयत्न करत असतात.

परंतु एवढे करून देखील जर धोका टळलेला नाही असे जेव्हा त्यांना वाटते तेव्हाच ते  हिस्स्स्स असा आवाज काढतात. यावर तज्ञ म्हणतात की जर तुम्हाला कोणत्याही ठिकाणहून असा आवाज येत असेल तर तुम्ही लागलीच सावध होणे गरजेचे आहे. या आवाजाचा अर्थ असा होतो की साप तुमच्या आजूबाजूला कुठेतरी आहे व तो तुम्हाला धोका समजत असून तुमच्यावर हल्ल्याची तयारी करत आहे.

अशावेळी तुम्ही कुठलाही प्रतिसाद न देता शांतपणे त्या ठिकाणहून निघून जाणे सोयीस्कर ठरते. परंतु जर तुम्ही असे केले नाही तर सापाकडून तुमच्यावर ताबडतोब हल्ला होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे तुम्ही सापाचा हिस्स्स असा आवाज जर ऐकला तर तुम्ही लागली सावध होऊन स्वतःचा बचाव करण्याकरता त्या ठिकाणाहून निघून जावे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts