Snake Viral News : साप हा एक सरपटणारा प्राणी. जगात सापाच्या विविध प्रजाती आढळतात. यातील काही प्रजाती फारच विषारी असतात. भारतातही सापाच्या असंख्य प्रजाती असून अनेक प्रजाती विषारी आहेत.
भारतात आढळणाऱ्या विषारी प्रजातींमध्ये किंग कोब्रा या विषारी जातीचा देखील समावेश होतो. भारतात आढळणारी एक सामान्य जात म्हणून किंग कोब्राला ओळखले जाते. ही विषारी जात मात्र अनेकांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरली आहे.
खरे तर भारतात आढळणाऱ्या बहुतांशी जाती या बिनविषारी आहेत. मात्र ज्या थोड्याफार प्रमाणात विषारी जाती आहेत ज्यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. एका आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सर्पदंशाच्या घटनांमुळे 58 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आला आहे.
यामुळे साप पाहिला तरी आपली पायाखालची जमीन सरकत असते. अनेकांना सापांची भीती वाटते. विषारी सापाच्या चाव्यामुळे थेट मृत्यू होण्याच्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडलेल्या आहेत यामुळे सापाची भीती वाटणे स्वाभाविक आहे.
अशातच, आता आपल्या महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापाच्या एका विषारी जातीचा शोध लागला आहे. ही विषारी जात दिसायला फारच खतरनाक आहे. या जातीला पाहिल्यानंतरच अनेकांचा थरकाप ऊडणार असे म्हटले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम घाटातील जंगलांमध्ये सापाची ही नवीन प्रजाती आढळली आहे. भारतात आढळणारा किंग कोब्रा या सापाच्या जातीची एक नवीन प्रजाती या भागात आढळली आहे.
या नव्या जातीला ओफियोफॅगस कलिंगा एसपी नोव असे नाव देण्यात आले आहे. संशोधकांनी या जातीच्या सापाचा सखोल अभ्यासही केला आहे. या अभ्यासाअंती असे आढळून आले आहे की पश्चिम घाटात आढळलेली ही नवीन जात फारच विषारी आहे.
किंग कोब्रापेक्षा अधिक विषारी जात म्हणून हिला ओळखले जात आहे. ज्या संशोधकांनी सापाच्या या नव्या जातीचा अभ्यास केला आहे त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा नव्याने आढळलेला किंग कोब्रा साप दिसायला फारच खतरनाक आहे.
हा साप सामान्य किंग कोब्रापेक्षा आकाराने मोठा आहे. त्याचा रंग हा काळा आहे. तसेच या जातीच्या सापाच्या अंगावर पिवळ्या रेषा सुद्धा आहेत. त्याच्या पोटाकडील भाग हलक्या पिवळ्या रंगाचा असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.
साप चावल्यानंतर त्यावर जर योग्य वेळेत उपचार केले गेले नाही तर मनुष्यचा मृत्यू होतो. यामुळे जर तुमच्या आसपास साप निघाला तर आधी सर्पमित्राला बोलावून घ्या. सापाला विनाकारण डिवचण्याचा प्रयत्न करू नका.
तसेच सापांना मारण्याचाही प्रयत्न करू नका. साप हे पर्यावरणासाठी आवश्यक असतात. सर्प हा अन्नसाखळीचा एक महत्त्वाचा घटक असून याचे संवर्धन करणे ही आपली साऱ्यांची जबाबदारी आहे.
म्हणून आपल्या आजूबाजूला, घरात अडगळीच्या खोलीत जर साप निघाला तर सर्वप्रथम सर्पमित्राला बोलावून तो साप जंगलात सोडून द्या. जर समजा एखाद्या व्यक्तीला सर्पदंश झाला तर त्याला मांत्रिकाकडे घेऊन न जाता सर्वप्रथम डॉक्टरकडे घेऊन जा.
भारतात सर्पदंशामुळे जेवढ्याही मृत्यूच्या घटना घडतात त्यामध्ये वेळेवर उपचार न मिळणे हे प्रमुख कारण असल्याचे उघडकीस आले आहे. म्हणून सर्पदंश झाल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे.