Snake Viral News : पावसाळ्याचा सीजन आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या काही दिवसांनी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. अशातच मात्र महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असल्याची माहिती समोर आली आहे. हवामान खात्याने या वर्षी सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर मध्येही चांगला जोरदार पाऊस होणार अशी शक्यता वर्तवली आहे.
हवामान खात्याने आज अनंत चतुर्दशी पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सक्रिय होणार असा अंदाज दिला आहे. आजपासून पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. खरंतर पावसाळ्याचा सीजन सुरू झाला की निसर्ग हिरवा शालू नेसतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र प्रसन्न वातावरण असते. मात्र पावसाच्या दिवसात साप सारखे अनेक सरपटणारे प्राणी बिळाबाहेर पडत असतात. साप एक विषारी प्राणी आहे. सापाच्या विविध जाती असून प्रत्येक जातीचा साप विषारी नसतो मात्र काही साप विषारी असतात.
भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे पावसाळ्याच्या काळात सापांपासून स्वतःचे रक्षण करणे आवश्यक आहे. काही लोकांची घरे ही जंगलाजवळ असतात. घराजवळ जंगल, दाट झाडे, गार्डन असते. तसेच काही लोक मळ्यात राहतात.
अशा घरांजवळ साप निघण्याची शक्यता दाट असते. मात्र जर घरात काही रोपे लावलीत तर साप घरात शिरू शकत नाहीत. असे काही रोपे आहेत ज्यांचा वास सापांना बिलकुल आवडत नाही. यामुळे साप अशा रोपांपासून लांब राहतात.
या झाडांपासून साप दूर पळतात
वर्मवूड : हे एक असे झाड आहे ज्याच्या उग्र आणि कडू वासामुळे साप याच्या जवळ येत नाहीत. हे झाड तुम्ही तुमच्या अंगणात, बाल्कनी मध्ये किंवा तुमच्या मेन गेटच्या समोर लावू शकता.
सर्पगंधा : ही एक औषधी वनस्पती आहे. शेतकरी या औषधी वनस्पतीची शेती करतात. या झाडांना एक उग्र वास असतो. हा वास सापांना मुळीच आवडत नाही. यामुळे तुम्ही तुमच्या अंगणात बाल्कनी मध्ये हे झाड अवश्य लावले पाहिजे. हे झाड औषधी तर आहेच शिवाय यामुळे तुमच्या घराजवळ सापही भरकटणार नाहीत.
कडूलिंब : कडुलिंबाचे झाड सुद्धा एक औषधी झाड आहे. कडू लिंबाचे पान, साल तसेच याचे फळ म्हणजेच लिंबोळी औषधी आहे. एवढेच नाही तर कडुनिंबाचा वापर हा सेंद्रिय कीटकनाशक बनवताना देखील केला जातो. हे झाड तुम्हाला सर्वत्र पाहायला मिळते.
गावात हे झाड असतेच. अनेकजण आपल्या अंगणात हे झाड लावतात. तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणात हे झाड लावू शकता. हे झाड खूपच उंच वाढते यामुळे घरापासून पुढे काही अंतरावर या झाडाची लागवड केली पाहिजे.
झेंडू : झेंडूची फुले खूपच सुंदर आणि सुगंधी असतात. मात्र याच फुलांचा वास सापांना सहन होत नाही. यामुळे तुम्ही झेंडूची रोप तुमच्या अंगणात, बाल्कनी मध्ये अवश्य लावली पाहिजे. तुम्ही हे रोग तुमच्या टेरेसवर देखील लावू शकता. यामुळे तुमचे अंगण, गार्डन, बाल्कनी सुंदर तर दिसणारच आहे शिवाय साप तुमच्या घरात घुसण्याची भीती देखील जवळपास नाहीशी होणार आहे.