Snake Viral News : सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे. सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा मोठा हाहाकार पाहायाला मिळत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला. यामुळे अनेक ठिकाणी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले. आता मात्र राज्यातून पावसाचा जोर थोडासा कमी झाला आहे.
मात्र असे असले तरी राज्यातील काही भागांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने पूरस्थिती तयार झाली. या पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी साप, विंचू यांसारख्या प्राण्यांचा सुळसुळाट झाला आहे. खरे तर दरवर्षी पावसाळी काळात साप आपल्या बिळातून बाहेर पडतात. बिळामध्ये पाणी घुसते आणि यामुळे साप अन्नासाठी आणि निवाऱ्यासाठी कोरड्या ठिकाणी धाव घेतात.
अनेकदा साप अन्न आणि निवाऱ्याच्या शोधात घरात देखील शिरतात. हेच कारण आहे की पावसाळ्याच्या काळात नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार भारतात वेगवेगळ्या प्रजातींचे साप आढळतात. मात्र यातील काही बोटावर मोजण्याइतकेचं साप विषारी आहेत.
पण असे असतानाही दरवर्षी देशात सर्पदंशामुळे 58 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारी समोर आली आहे. यातील सर्वाधिक सर्पदंश हे पावसाळ्याच्या काळात झाले आहेत. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की सापांपासून नागरिकांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सापांना काही झाडे खूपच आवडतात.
अशा झाडांजवळ सापांचा वावर पाहायला मिळतो. यामुळे जर तुमच्या अंगणात असे झाडे असतील तर तुम्ही ही झाडे एकतर उपटून काढायला हवीत किंवा या झाडांची वेळोवेळी छाटणी करायला हवी. तसेच तुमच्या अंगणाचा आणि बागेचा परिसर स्वच्छ ठेवायला हवा. जर अशी झाडे तुमच्या घराजवळ असतील तर घरात साप घुसण्याची भीती अधिक असते. यामुळे आज आपण कोणत्या झाडांकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात, याविषयी जाणून घेणार आहोत.
चंपा : चंपा हे एक महत्त्वाचे फुल झाड आहे. याचे फुल हे खूपच सुंदर आणि सुगंधी असते. यामुळे अनेकजण या झाडाच्या आपल्या अंगणात लागवड करतात. मात्र या झाडांच्या वेलात आणि पानांमध्ये साप सहजतेने लपून बसतात. यामुळे, हे झाड घरातशेजारी लावू नये असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
लिंबाचं झाड : अनेक जण आपल्या अंगणात लिंबाच झाड लावतात. पण जाणकार लोकांनी या रोपाकडेसुद्धा साप आकर्षित होत असल्याची माहिती दिली आहे. यामुळे हे झाड घराशेजारी लावू नये असे म्हटले जाते. जर समजा एखाद्याने हे झाड आपल्या अंगणात लावले असेल तर अशा प्रकरणात त्या व्यक्तीने या झाडाची वारंवार छाटणी केली पाहिजे. तसेच या झाडाच्या आजूबाजूचा परिसर चांगला स्वच्छ ठेवला पाहिजे जेणेकरून साप शिरणार नाही असा सल्ला दिला आहे.
घाणेरी : घाणेरी चे झाड तुम्हीही पाहिले असेल. खरे तर ही एक औषधी वनस्पती आहे. यासोबतच हे प्रमुख फुल झाड देखील आहे. या झाडाला लागणारे सुंदर फुल खूपच आकर्षक आणि अप्रतिम सुंगध देतात. पण या झाडांकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. यामुळे जर तुम्ही तुमच्या अंगणात हे झाड लावले असेल तर ते आत्ताच काढून टाका.
तुळस : हिंदू सनातन धर्मात तुळशीला फार महत्त्व आहे. हिंदू लोकांच्या अंगणात तुम्हाला तुळस सहजतेने पाहायला मिळते. हिंदू लोक तुळशीची पूजा करतात. यासोबतच हे एक प्रमुख औषधी रोपटे सुद्धा आहे. याचे अनेक औषधी गुणधर्म तुम्हीही कधी ना कधी ऐकलेली असतील. मात्र या औषधी वनस्पती कडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात.
तुळसला असणारा सुगंध सापांना आवडतो आणि यामुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. हेच कारण आहे की जर तुमच्याही घरात तुळस लावलेली असेल तर त्याच्या आजूबाजूला परिसर स्वच्छ असायला हवा. तसेच तुळशीची सातत्याने छाटणी देखील झाली पाहिजे. तुळस ही जमिनीत लावू नये, तुळस वृंदावनातच लावली पाहिजे.