Snakes Facts & information : सापाबद्दल समाज मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज आणि काही श्रद्धा व अंधश्रद्धा देखील आहेत. दुसरे म्हणजे साप म्हटले म्हणजे मनामध्ये मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण होते. समोर साप दिसला तरी माणूस अक्षरशः पळत सुटते इतक्यापर्यंतची भीती माणसाच्या मनामध्ये सापाबद्दल आहे.
परंतु जर आपण सापांच्या बद्दल असलेले काही महत्त्वाचे फॅक्ट जर तपासून पाहिले तर यामध्ये आपल्या मनात असलेले बरेच समज हे चुकीचे आहेत असे आपल्याला दिसून येते. यातील जर आपण पहिला समाज पहिला तर साप हे विषारी असतात हा होय.
परंतु यामध्ये प्रत्येकच साप विषारी असतो असे नाही. भारताचा विचार केला तर काही बोटावर मोजण्याइतके साप विषारी आहेत व त्यातील चार ते पाच जाती या जास्त विषारी आहेत.
अशाप्रकारे अनेक समज किंवा गैरसमज माणसाच्या मनामध्ये सापाबद्दल आहेत. याच अनुषंगाने आपण काही महत्त्वाच्या मनोरंजक अशा गोष्टी आपण बद्दलच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
सापाबद्दलचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट
1- सापांच्या डोळ्यांना पापण्या राहत नाही हे एक मनोरंजक अशी गोष्ट आहे.
2- जगभरात सापाच्या जवळपास 3400 प्रजाती आहेत. त्यातील फक्त सहाशे या विषारी प्रजाती आहेत.
3- सापांची त्वचा ही चिकणी आणि कोरडी असते. त्यामुळे साप त्याची कात म्हणजेच त्वचा वर्षातून बऱ्याचदा बदलतो.
4- साप हे प्रामुख्याने मांसाहारी असतात. परंतु ते त्याच्या शिकारला कापून किंवा तुकडे करून नाही खात किंवा ते तसे खाऊ शकत नाही म्हणून ते शिकारला किंवा भक्षाला जिवंत गिळून घेतात.
5- सापाच्या तोंडाची रचनाच एवढी लवचिक असते की साप तोंडामध्ये त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराच्या भक्षाला देखील आरामात गिळू शकते.
6- जगाच्या पाठीवर अंटार्टिका हा भाग सोडला तर प्रत्येक ठिकाणी साप आढळून येतात.
7- जगातील सर्वात लांब साप म्हणून पायथन रेटीकुलटेस हा आहे. याची लांबी साधारणपणे 8.7 मीटर म्हणजे 28 फूट पेक्षा देखील जास्त असते. हा जगातील सर्वात लांब साप म्हटला जातो.
8- यामध्ये ॲनाकोंडा या सापाची लांबी पाच मीटर म्हणजे 16 फिट पर्यंत असते. या जातीचा साप हा दक्षिण अमेरिका या परिसरात जास्त प्रमाणात आढळून येते. या जातीच्या सापाचे वजन 250 किलोग्रॅम पर्यंत देखील असते.
9- जे साप पाण्यात राहतात किंवा समुद्र साप ही जी काही सापांची प्रजाती आहेत ते त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून श्वास घेत असतात व म्हणूनच ते जास्त वेळ पर्यंत पाण्यात राहू शकतात.
10- ब्लॅक मंबा हा जगातील सर्वात विषारी साप समजला जातो. या सापाने जर चावा घेतला तर जवळपास 45 मिनिटांमध्ये जर उपचार मिळाले नाही तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
11- ब्राझील या देशांमध्ये स्नेक आयलँड नावाचे एक बेट असून सापासाठी हे प्रसिद्ध आहे. जगातील सर्वात जास्त साप या परिसरात सापडतात. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर प्रत्येक 11 वर्ग फूट अंतरामध्ये एक साप तुम्हाला आढळून येतो.
12- साप जास्त प्रमाणात हात किंवा पाय तसेच घोट्याला चावतात.
13- भारतामध्ये सर्वात जास्त धोकादायक सापाला ग्रीनपीट वायपर या नावाने ओळखतात.
14- सापाचे वय हे त्याच्या जातीवरून ठरवले जाते. उदाहरणच घ्यायचे झाले तर कॉर्न साप हे पाच ते दहा वर्षे जगतात तर बॉल अजगर 20 ते 30 वर्षे जगू शकतो. किंग कोब्रा हा बारा ते पंधरा वर्ष जगतो.
15- एक साप सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत पाहू शकतो.
16- साप 24 तासांमध्ये सुमारे 16 तास झोपतो.
साप चावला तर काय करावं ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर साप चावला तर ज्याला चावला आहे त्याला ताबडतोब थोडे तूप खायला द्यावे व त्याला उलट्या करायला लावावे. त्यानंतर त्याला दहा ते पंधरा वेळा कोमट पाणी देऊन उलट्या करायला सांगावे.