पावसाळ्याचा कालावधी म्हटला म्हणजे बऱ्याचदा जेव्हा जोराचा पाऊस होतो तेव्हा बऱ्याच ठिकाणी पाणी साचते. अशाप्रकारे पाणी साचल्यामुळे साप तसेच उंदीर, इत्यादी प्राण्यांचे बिळे त्यांचा निवारा नष्ट झाल्याने ते निवाऱ्यासाठी अडगडीची जागा शोधता तो कधीकधी घराच्या आजूबाजूला किंवा घरात देखील प्रवेश करू शकता.
यामध्ये साप जर घराच्या किंवा एखादया अडगडीत बसला व चुकून धक्का सापाला लागला तर सर्पदंश होण्याची शक्यता वाढते व जीवावर देखील बेतू शकते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे आपण घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारचे शोभेच्या वनस्पती किंवा झाडे लावतो.
यातील बरीच झाडे हे सापांना घरापासून किंवा घराच्या आजूबाजूला येण्यापासून अटकाव करतात. परंतु यातील काही रोपे किंवा झाडे हे सापांना जवळ येण्यास देखील कारणीभूत ठरतात कारण साप अशा काही रोपांमुळे आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे ज्या रोपांमुळे साप आकर्षित होतात अशी रोपे घराच्या आजूबाजूला किंवा घरातील कुंड्यांमध्ये लावायचे टाळणे गरजेचे आहे.
सापांना आकर्षित करतात ही रोपे
1- तुळस– तुळस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व बहुतेक आपल्या भारतीय परंपरेमध्ये तुळशीला धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व असल्याकारणाने आपल्या भारतामध्ये बऱ्याच घरांसमोर आपल्याला तुळस लावलेली दिसते.
परंतु सापांच्या दृष्टिकोनातून बघितले तर तुळस ही वनस्पती सापांना आकर्षित करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. तुळशीच्या रोपांचा वास आणि पाने सापांना आकर्षित करतात व त्यामुळे तुळस कायम घरात ठेवावी. परंतु बाहेर नाही.
2- घाणेरी– ही एक औषधी वनस्पती असून घाणेरीला चमकदार आणि अत्यंत आकर्षक स्वरूपाचे अशी फुले लागतात. परंतु हीच फुले सापांना देखील आकर्षित करू शकतात. त्यामुळे घाणेरीचे रोप कधीच घरामध्ये किंवा घराजवळ ठेवू नये.
3- लिंबाचे रोप– बऱ्याचदा आपल्याला घराच्या बगीच्यामध्ये लिंबाचे रोप किंवा लिंबाचे झाड आढळून येते. यामध्ये लिंबाच्या रोपाकडे देखील साप मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.
लिंबाच्या वेली आणि पानांमध्ये देखील साप लपून राहू शकतात. त्यामुळे तुमच्या घराच्या बगीच्या मध्ये लिंबाचे झाड असेल तर त्याची छाटणी करून घेणे गरजेचे असते. जेणेकरून साप त्याच्यात लपून बसणार नाहीत.
4- चंपा– चंपा हे रोप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे व ते प्रामुख्याने त्याचे फुल व त्याच्या फुलांचा सुगंध याकरिता प्रामुख्याने ओळखले जाते.
परंतु सापाच्या दृष्टिकोनातून बघितले तर चंपा या रोपाच्या वेली आणि पानांमध्ये साप सहजपणे आडोशाला लपून राहतात. त्यामुळे चंपाचे रोप हे घराच्या मेन गेट किंवा मुख्य दरवाजासमोर लावू नये किंवा ठेवू नये.
5- गोकर्ण– गोकर्णाच्या रोपाला देखील दाट स्वरूपामध्ये पाने लागलेले असतात व या पानांमध्ये साप सहजपणे लपून राहतात. तसेच गोकर्णला निळसर रंगाची फुले येतात व ही फुले सापांना आवडतात. या सगळ्या कारणामुळे गोकर्णची लागवड घराजवळ मुळीच करू नये.