स्पेशल

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 11 कोटी रुपये; सरकारकडून निधी मंजूर

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. वास्तविक राज्य शासनाच्या माध्यमातून नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना गेल्या सरकारच्या कार्यकाळात सुरू करण्यात आली होती.

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय गेल्या सरकारच्या काळात घेण्यात आला आहे. पण याची अंमलबजावणी मात्र वर्तमान सरकारच्या कार्यकाळात होत आहे. या योजनेअंतर्गत 2017-18, 2018 19, 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जात आहे.

50,000 पर्यंतचे अनुदान पात्र शेतकऱ्यांना मिळतं आहे. पण अनेकांना या योजनेअंतर्गत निधी अभावी लाभ मिळत नव्हता. दरम्यान आता अर्थसंकल्पीयं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत उर्वरित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधीला मंजूरी देण्यात आली आहे. यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील 2740 शेतकऱ्यांना 11 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर होणार आहे.

निश्चितच सोलापूर जिल्ह्यातील 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदानासाठी पात्र उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच आता अनुदान मिळणार आहे. खरं पाहता या योजनेसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 10 ऑक्टोबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 दरम्यान तब्बल नऊ वेळा निधी वितरणास मान्यता देण्यात आली. मात्र असे असले तरी या योजनेच्या अनेक पात्र शेतकऱ्यांना निधी अभावी प्रोत्साहन अनुदान मिळत नव्हते.

परिणामी या योजनेसाठी पुरवणी मागण्याच्या माध्यमातून निधीची मागणी करण्यात आली होती. आता या पुरवणी मागणीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात अनुदान मिळणार आहे. म्हणजे आता सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा बँकेचे पात्र 1740 आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या 1000 शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts