Solapur Osmanabad Railway : महाराष्ट्रातील बहुचर्चित सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाबाबत एक महत्त्वाच अपडेट हाती आल आहे. हा सदर होऊ घातलेला रेल्वे मार्ग आता जलद गतीने पूर्ण होण्याचे संकेत आहेत.
या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी आता लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे चित्र आहे. यासाठी राज्य शासनाने आपल्या हिस्साचे 452 कोटी 46 लाख रुपये देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे हा रेल्वेमार्ग आता लवकरच सत्यात उतरणार आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विकासाची गंगा वाहणार आहे.
या बहुचर्चित रेल्वे मुळे महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला, पर्यटन क्षेत्राला तसेच उद्योग जगताला मोठी उभारी मिळणार आहे. ची महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही भागाला जोडणारा हा मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. मात्र आता राज्य शासनाने राज्य हिस्सा म्हणून 452 कोटी 46 लाख रुपये निधीला मान्यता दिली असल्याने लवकरच या रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या चर्चीत मार्गावर सोलापूर, खेड, मार्डी, तामलवाडी, माळुंब्रा, रायखेल, वडगाव, तुळजापूर, सांजा व उस्मानाबाद अशी दहा स्टेशन राहणार असून आगामी काही दिवसात प्रत्यक्षात भूसंपादनाच्या कामाला सुरुवात होणार आहे.
हा रखडलेला रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी नवोदित शिंदे सरकारने भूसंपादन प्रक्रिया राबवणे हेतू राज्य सरकारचा हिस्सा बहाल केला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या खर्चासाठी मान्यता देण्यात आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा मार्ग एकूण 84 किलोमीटरचा राहणार असून उस्मानाबाद मधील तुळजापूर तालुक्यातील 15 आणि सोलापूर जिल्ह्यातील नऊ गावांचा समावेश राहणार आहे.
खरं पाहता सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात या मार्गाचा जमीन संपादनाचा अंतिम अहवाल सादर झाला आहे. दरम्यान आता राज्य शासनाकडून निधीला मान्यता देण्यात आली असल्याने लवकरच या मार्गाचे कामकाज सुरू होणार आहे.
हा दोन विभागाला जोडणारा रेल्वे मार्ग सोलापूर जिल्ह्यातील बाळे, केगाव, भोगाव, गुळवंची, कारंबा, बाणेगाव, मार्डी, सेवालालनगर, होनसळ तर तुळजापूर तालुक्यातील वडगाव, काटी, तामलवाडी, गंगेवाडी, सुरतगाव, सांगवी काटी, गोंधळवाडी, माळुंब्रा, कदमवाडी, सारोळा, रायखेल, हंगरगा, मंगरूळपाटी, तुळजापूर, तडवळा आणि उस्मानाबादजवळील बोरी, बावी, वडगाव, पळसवाडी, देवळाली, शेखापूर, उस्मानाबाद, सांजा, जहाँगीरदारवाडी या गावांमधून जाणार आहे.
निश्चितच, येत्या काही दिवसात या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया राबवली जाणार असून यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लागणार आहे. दरम्यान या रेल्वेमार्गासाठी श्रेय घेण्याचे राजकारण देखील सुरू झाले आहे.
ठाकरे सरकारने गत महाविकास आघाडी सरकारमध्ये या निधीला मंजुरी मिळाली असल्याचे सांगितले असून शिंदे सरकारने हा निधी बहाल करण्यासाठी उशीर केला असल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत आरोप-प्रत्यारोपात का होईना या मार्गासाठी मुहूर्त सापडला आहे. यामुळे कोणत्याही सरकारने यासाठी पुढाकार घेतला असला तरी देखील सामान्य जनतेचा यामुळे फायदा होणार आहे.