Solar Panel Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरू आहे. दरम्यान वीज बिलाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळावा या अनुषंगाने केंद्रातील सरकारने सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील अनुदान देण्याची मोठी योजना सुरू केली आहे.
या योजनेला पी एम सूर्यघर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले असून या योजनेअंतर्गत नागरिकांना त्यांच्या घराच्या शेतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.
या योजनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपयांचे अनुदान दिले जात असून या योजनेमुळे सोलर पॅनल बसवून ग्राहकांना मोफत वीज मिळवता येणे शक्य होणार आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची वीज बिलाची कटकट कायमची दूर होणार आहे.
एकदा सोलर पॅनल इंस्टॉल केले की पुढील 20 ते 21 वर्षे तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळणार आहे. एवढेच नाही तर सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करूनही कमाई करू शकणार आहात. ही योजना फक्त महाराष्ट्रात सुरू आहे असे नाही तर देशातील सर्व नागरिक सौर रूफटॉप योजनेसाठी अर्ज करू शकतात.
यासाठी, सरकारने एक अधिकृत वेबसाइट देखील सुरू केली आहे जिथे तुम्ही अर्ज करू शकता आणि सौर पॅनेल स्थापित करू शकता. आता आपण या योजनेअंतर्गत नागरिकांना सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी किती अनुदान मिळते या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
या योजनेअंतर्गत एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना तीस हजार रुपये, दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60000 रुपये आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
म्हणजेच सोलर पॅनल च्या क्षमतेनुसार अनुदानाची रक्कम चेंज होते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नागरिकांकडे स्वतःच्या हक्काचे घर असावे. फ्लॅटमध्ये असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, ती व्यक्ती मूळची भारतीय असणे अनिवार्य आहे. तुम्हाला जो सोलर पॅनल बसवायचा आहे तो भारतात बनलेला असावा. जे नोंदणीकृत डीलर असतील त्यांच्याकडूनच सोलर पॅनल बसवावा लागणार आहे. देशातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास पूर्णपणे पात्र आहेत.