Solar Rooftop Yojana : सध्या गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस थांबला आहे. दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली असून आगामी काही दिवसात उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे. आता उन्हामुळे जीवाची काहीली होणार आहे. यामुळे उन्हापासून बचाव म्हणून एसी, फ्रिज, कुलर, पंखा यांचा वापरही वाढणार आहे.
या उपकरणांचा वापर वाढला म्हणजेच विज बिल देखील अधिक येण्याची शक्यता आहे. आता यामुळे खिशाला मात्र कात्री लागणार आहे. पण जर आपणास या उपकरणांचा वापरही करायचा असेल आणि विज बिल देखील यायला नको असं जर वाटत असेल तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी.
खरं पाहता जर आपणास वीजबिलापासून कायमची सुटका मिळवायची असेल तर घरावर सोलर पॅनल बसवण हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय सिद्ध होऊ शकतो. दरम्यान, आज आपण घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून काही मदत केली जाते का? तसेच यासाठी कोणती योजना आहे आणि यासाठी कशा पद्धतीने अर्ज करावा लागतो याबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
देशभरातील नागरिकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून अनुदान दिले जाते. त्यासाठी सोलर रूट टॉप योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यासाठी सर्वप्रथम मात्र ग्राहकांना त्यांना किती वीज आवश्यक असते, म्हणजेच किती विजेची निर्मिती त्यांना करायची आहे हे आधी ठरवावे लागेल. आता आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून किती वीज सर्वसामान्य घरासाठी लागू शकते याविषयी जाणून घेऊया.
समजा जर तुमच्या घरात रोज दोन किंवा तीन पंखे चालतात, एक फ्रिज आहे, सात ते आठ एलईडी ब्लब चालतात, टिव्ही, अशा वस्तू आहेत तर, तुम्हाला सहा ते आठ युनिट वीज रोज लागणार आहे. आता ही वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यासाठी घरावर दोन किलोवॅटचे सोलर पॅनल तुम्हाला लावावे लागणार आहे. यातून तुमच्या घराची गरज 100% भागणार आहे. आता मोठा प्रश्न असा की यासाठी किती खर्च येणार आणि शासनाकडून किती अनुदान मिळणार?
दोन किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी किती खर्च येतो?
काही तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार दोन किलो सोलर पॅनल बसवण्यासाठी जवळपास एक लाख वीस हजाराचा खर्च येतो. मात्र सोलर पॅनल एकदा बसवले की 25 वर्ष यापासून विजेची निर्मिती ही होत असते. त्यामुळे एकदा खर्च केला की तब्बल 25 वर्षे वीज बिलाचे टेन्शन राहणार नाही. विशेष म्हणजे यासाठी शासनाकडून अनुदानही मिळतं म्हणून संपूर्ण पैसा ग्राहकांना द्यावा लागणार नाही. आता आपण यासाठी किती अनुदान मिळणार याविषयी जाणून घेऊया.
रुफटॉप सोलर योजनेअंतर्गत किती अनुदान मिळतं
रूफ स्टॉप सोलर योजनेअंतर्गत घरगुती वापरासाठी सोलर पॅनल बसवण्याकरिता तब्बल 40% अनुदान दिले जाते. म्हणजेच जर एखाद्याला दोन किलो वॅट सोलर पॅनल बसवायचे असेल तर अशा व्यक्तीला एक लाख वीस हजारांपैकी 40% अनुदान मिळेल म्हणजेच एकूण 72 हजार रुपयाचा खर्च लागेल. आता सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न योजनेसाठी कसा अर्ज करायचा, चला तर मग याविषयी जाणून घेऊया.
हे पण वाचा :- शिंदे-फडणवीस सरकारचा एसटी तिकिटात 50% सवलतीचा निर्णय रद्द होणार? पहा काय आहे प्रकरण
योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी अर्ज करणे हेतू Sandes अँप्लिकेशनच्या मदतीने अर्ज सादर करता येणार आहेत. यासाठी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचे आहे आणि नोंदणी करायची आहे. नोंदणी करताना तुमचे राज्य निवडा, तुमची वीज वितरण कंपनी निवडा. तूमचा वीज ग्राहक क्रमांक प्रविष्ट करा, मोबाईल नंबर टाका, ईमेल आयडी भरा, त्यानंतर पोर्टलच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करा. एवढे केल्यानंतर आपली नोंदणी पूर्ण होईल.
यानंतर युजर आयडी किंवा मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून या पोर्टल वर पुन्हा एकदा लॉगिन घ्या. यानंतर या योजनेसाठीचा फॉर्म काळजीपूर्वक भरावा लागणार आहे. अर्ज भरल्यानंतर मात्र संबंधित अर्जदार व्यक्तीला डिस्कॉमच्या मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल. यानंतर मंजुरी मिळेल, मग DISCOM पॅनेलमधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सौर पॅनेल स्थापित करावा लागेल.
सोलर पॅनल बसवल्यानंतर त्याचा तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करायचा आहे. मग DISCOM द्वारे नेट मीटरची स्थापना आणि तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करतील. मग कमिशनिंगचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागतो. अनुदानाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या खात्यात 30 दिवसांच्या आत जमा केली जाते.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता लागू; GR जारी, पहा….