Soyabean Market : गत हंगामात सोयाबीनला चांगला दर मिळाला होता. याही हंगामात चांगला दर मिळण्याची आशा होती. मात्र, सध्या सोयाबीनचे दर दबावात आहेत. हमीभावापेक्षा अधिक दर सोयाबीनला मिळत असला तरी देखील गेल्या हंगामाशी तुलना केली असता सध्या भाव दबावात पाहायला मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या व्यापारी धोरणामुळे सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे मत काही तज्ञ व्यक्त करत आहेत.
गेल्या हंगामाच्या पद्धतीने सोयाबीनचे बाजारात कमी दर झाले की सोयाबीनची विक्री शेतकऱ्यांनी थांबवली होती आणि केवळ विक्रमी दरात विक्री केली होती. असंच काहीसं धोरण याही हंगामात काही शेतकऱ्यांनी अंगीकारल आहे. बाजारात सोयाबीनला कमी दर मिळत असल्याने सोयाबीनची आवक शेतकऱ्यांनी कमी केली आहे. परिणामी 50 ते 100 रुपयांची दरवाढ प्रतिक्विंटल मागे झाली आहे. निश्चितच ही दरवाढ कमी आहे.
मात्र भविष्यात आणखी दर वाढू शकतात असं मत व्यक्त केलं जात आहे. खरं पाहता तूर्तास उद्योगांकडून सोयाबीनचा पुरवठा जास्त आणि कमी मागणी असा युक्तिवाद करत सोयाबीनचे दर दबावात ठेवले आहेत. वास्तविक देशातून विक्रमी पातळीवर सोया पेंड निर्यात होत आहे. एवढेच नाही तर खाद्यतेलाचा देखील आता आधार मिळत आहे. जागतिक बाजारातही सोयाबीन तेचीत आहे. पण तरीही गेल्या महिन्याभरापासून उद्योगाकडून सोयाबीनच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही.
सोयाबीनचे दर अजून काही काळ वाढवले नाही तर शेतकरी याच दरात सोयाबीनची विक्री करतील अस उद्योगांना वाटतं आहे. अशा परिस्थितीत या नरमलेल्या दरात किती शेतकरी सोयाबीनची विक्री करतात यावरच पुढील भाव अवलंबून राहणार आहेत. खरं पाहता सध्या स्थितीला साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव सोयाबीनला मिळणे अपेक्षित आहे मात्र तरीही बाजारात 5100 ते 5200 दरम्यानच सोयाबीनला भाव मिळत आहे. कालचा लिलावात देशांतर्गत सोयाबीन 5200 ते 5400 दरम्यान विक्री झाला आहे.
प्रक्रिया प्लांट्स मध्ये मात्र 5400 ते 5500 दरम्यान भाव मिळत होता. दरम्यान सोयाबीनची आवक येत्या काही दिवसात वाढली नाही किंवा याहीपेक्षा कमी झाले तर दरवाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होईल असं मत बाजार अभ्यासक वर्तवत आहेत. तज्ञांच्या मते देशातून सोया पेंड निर्यात वाढत आहे. सोयाबीनची मागणी ही चांगली वाढली आहे. यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर वाढवावे लागणार आहेत. परिणामी जर आवक मर्यादित राहिले किंवा कमी झाली तर दरवाढीसाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.
सध्याचा बाजार पाहता सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी आखल पाहिजे असं मत तज्ञांच आहे. शिवाय येत्या काही दिवसात सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती तयार होईल यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे गरजेचे आहे. निश्चितच शेतकऱ्यांनी सोयाबीनची आवक बाजारात वाढवली नाही तर दर वाढू शकतात असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.