Soyabean Production : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक. या नगदी पिकाची राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात शेती केली जाते. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र या भागात याची शेती पाहायला मिळते. अर्थातचं राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
वास्तविकता हे शाश्वत उत्पन्न देणारं पीक म्हणून ओळखलं जातं. यंदा मात्र सोयाबीन हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न देणारे पीक ठरले नाही. सोयाबीनचे एकरी उत्पादन मात्र अडीच क्विंटल एवढं राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातुन ही सोयाबीनची उत्पादकता समोर आली आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्हाप्रमाणेच राज्यातील इतरही जिल्ह्यात सोयाबीन पिकाला अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि परतीचा पाऊस घातक ठरला आहे.
यामुळे इतरही जिल्ह्यात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. सहाजिकच या हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी आहे. मात्र असे असले तरी चालू हंगामात अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत. गत हंगामात सोयाबीनला 8000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर नमूद केला जात होता. या चालू हंगामात देखील शेतकऱ्यांना अशाच दराची आशा होती. मात्र या हंगामात उत्पादनात घट झालेली असतानाही दरात तेजी पाहायला मिळालेली नाही.
यामुळे कुठे ना कुठे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी होत आहे. शेतकरी बांधवांच्या मते, या चालू हंगामात सोयाबीन उत्पादित करण्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागला आहे. सुरुवातीला अतिवृष्टी झाली परिणामी शेतात गुडघाभर पाणी साचले यातून पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पिकांवर वेगवेगळ्या रोगांचे सावट आले म्हणून वेगवेगळ्या औषधांची, टॉनिकची, खतांची मात्रा पिकाला देण्यात आली.
एवढे करूनही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यातून मात्र थोडेसे पीक बचावले. या अतिवृष्टी मधून अधिक खर्च करून वाचवलेल्या पिकाला देखील शेवटी सततचा पाऊस आणि परतीचा पाऊस घातक ठरला. यामुळे उत्पादकता मोठी घटली. अमरावती जिल्ह्यात शासकीय आकडेवारीनुसार सोयाबीनची एकरी उत्पादकता अडीच क्विंटल आली आहे.
शेतकऱ्यांच्या मते सोयाबीन उत्पादित करण्यासाठी क्विंटल मागे 5200 रुपयांचा खर्च आला आहे. सद्यस्थितीला सोयाबीनचे दर साडे पाच हजाराच्या खालीच आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी सरासरी दर यापेक्षा कमी आहेत. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे शेतकऱ्यांसाठी मुश्कील बनत आहे.
एकंदरीत यंदा शेतकऱ्यांचे कष्ट पाण्यात गेले आहेत. दरम्यान काही जाणकार लोकांनी भविष्यात सोयाबीन दरात थोडीशी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. आता सोयाबीन दारात किती वाढ होते हे तर सांगण कठीण आहे मात्र दरवाढ होईल यामुळे शेतकरी बांधवांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.