Soybean Cotton Price : सोयाबीन आणि कापूस गेल्यावर्षी विक्रमी भावात विक्री झाला. परिणामी या दोन्ही पिकांच्या लागवडीखालीलक्षेत्रात थोडी थोडी वाढ यंदा नमूद करण्यात आली. शेतकऱ्यांना गेल्या वर्षी प्रमाणे चांगला दर मिळेल अशी आशा होती. पण हंगाम सुरू झाल्यापासून ते आजतागायत सोयाबीन आणि कापसाला अपेक्षित असा बाजार भाव मिळालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
अशातच आता बाजारापेक्षा कमी कापूस आणि सोयाबीन दर वाढीसाठी पोषक परिस्थिती असल्याचे मत व्यक्त केल आहे. तज्ञांच्या मते एलनिनोच्या चर्चेमुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना सध्या स्थितीला फायदा होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे अमेरिकेच्या हवामान विभागाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा एलनिनो ची परिस्थिती तयार होणार असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे देशातील काही संस्था देखील या गोष्टीला दुजोरा देत आहेत.
काही तज्ञांनी मात्र आत्ताच याबाबत अंदाज वर्तवणे घाईचे राहणार असल्याचे मत व्यक्त केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की एलनिनोमुळे पश्चिमेकडील भागात दुष्काळ पडतो तर पूर्वेकडील भागात अतिवृष्टी सारखी परिस्थिती तयार होते. म्हणजेच अमेरिकन हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जर सत्यात उतरला तर हिंदुस्थानासह संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाची परिस्थिती तयार होऊ शकते. पाऊसमान हा कमी राहू शकतो. तर दुसरीकडे अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिना या देशात अधिक पाऊस पडेल काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल.
साहजिकच असं झालं तर येणाऱ्या खरीप हंगामात तेलबिया पिकांसमवेतच कापूस आणि इतर पिकांची उत्पादकता कमी होईल. खरीप हंगामातील सोयाबीन कापूस मका समवेतच सर्वच पिकांना कमी पावसाचा फटका बसेल. एवढेच नाही तर पाऊस जर कमी राहिला तर रब्बी हंगामातील पिकांना देखील यामुळे कमी पाणी उपलब्ध राहील आणि त्यांची ही उत्पादकता कमी होईल. शिवाय भाजीपाला आणि इतर फळ पिकांना देखील याचा फटका बसेल. मात्र याबाबत आत्तापासूनच अंदाज वर्तवणे हे घाईचे ठरेल असं मत भारतीय हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय काही काही हवामान तज्ञांनी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात ॲलनिनोचा अंदाज बांधला तर प्रामुख्याने हा अंदाज फोल ठरतो अस देखील मत व्यक्त केल आहे. तसेच काही तज्ञांनी अनेकदा एलनिनो आला तरी देखील भारतात चांगला पाऊस पाहायला मिळाला असल्याचे मत व्यक्त केल आहे. निश्चितच याबाबत भारतीय हवामान विभाग जेव्हा आपला मान्सून बाबतचा पहिला अहवाल सादर करेल तेव्हा योग्य ती स्पष्टोक्ती येऊ शकणार आहे. तूर्तास मात्र ॲलनिनोच्या चर्चामुळे भारतीय सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे मत काही बाजार भाव अभ्यासकांनी व्यक्त केल आहे.
या चर्चांमुळे सोयाबीन आणि कापूस दरात तेजी येणार आहे. तज्ञांच्या मते ॲलनिनोमुळे पुढील हंगामात सोयाबीन अन कापूस उत्पादन घटेल असं चित्र अमेरिकन हवामान विभागाच्या अंदाजामुळे तयार होत आहे. साहजिकच यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सोयाबीन आणि कापूस चे भाव वाढू शकतात. पण खरंच एलनिनो येईल का? याबाबत योग्य ती माहिती येत्या काही महिन्यातच समोर येऊ शकणार आहे. याबाबत आत्तापासूनच अंदाज बांधणे साफ चुकीचे असल्याचे भारतीय वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे. यामुळे निश्चितच तूर्तास तरी शेतकऱ्यांना एलनिनोमुळे दिलासा मिळेल असे चित्र आहे.