स्पेशल

सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….

Soybean Farming : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनने सांगावा पाठवला आहे. मान्सूनचे लवकरच राज्यात आगमन होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची शेती कामांची लगबग वाढली आहे.

शेतकरी बांधव जमिनीची पूर्व मशागतीचे कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी धावपळ करत आहेत. सोबतच बी-बियाण्यांची जुळवाजवळ सुरू झाली आहे.

यंदा शेतकरी मात्र घरच्या बियाण्यांना अधिक प्राधान्य देत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी यंदा आम्ही घरचेच बियाणे पेरणार असं आम्हाला सांगितल आहे. राज्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते.

हे पण वाचा :- पंजाब डख सुधारित मान्सून अंदाज 2023 : 3 जून पासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार ; महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात कोसळणार धो-धो पाऊस !

दरम्यान यंदा सोयाबीन उत्पादक देखील घरचेच बियाणे अधिक वापरणार आहेत. घरची बियाणे वापरणे निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असून यामुळे उत्पादन खर्चात बचत होते. मात्र घरचे बियाणे वापरताना शेतकऱ्यांना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे.

यामध्ये बियाण्याची उगवण क्षमता तपासणे अतिशय आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आज आपण घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता कशा पद्धतीने घरच्या घरी तपासली जाऊ शकते यासंदर्भात बहुमूल्य अशी माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! तलाठी भरती निघाली; 4625 रिक्त तलाठ्यांची पदे भरली जाणार, केव्हा होणार परीक्षा? वाचा….

बियाण्याची उपवण क्षमता तपासण्याची प्रोसेस !

बियाण्याची उगवणक्षमता तपासण्यासाठी गोणपाटाचे सहा छोटे तुकडे करा. यानंतर गोणपटाच्या एका तुकड्यावर बियाण्याची 100 दाणे 10-10 च्या रांगेत दोन-दोन सेंटीमीटर अंतरावर ठेवा. अशाप्रकारे तीन गोणपाटाच्या तुकड्यावर तीन नमुने तयार करा.

यानंतर हे नमुने ओले करा. यावर गोणपाटचा दुसरा तुकडा टाका. पुन्हा एकदा हे नमुने ओले करा. मग या नमुन्याचे गोल गुंडाळी करा. ही गुंडाळी सावलीच्या ठिकाणी ठेवा. सहा ते सात दिवस ही सावलीच्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर अधूनमधून पाणी शिंपडत राहा.

सात दिवसानंतर हे नमुने उघडा. मग अंकुरलेले बियाण मोजा. जर 100 दाण्यांपैकी 70 दाणे अंकुरलेले असतील तर उगवण क्षमता 70% असल्याचे गृहीत राहावे. बियाणे उगवण क्षमता 70% असेल तर हे बियाणे चांगले असते मात्र 60% पेक्षा कमी उगवण क्षमता असेल तर मात्र असे बियाणे पेरणीसाठी वापरू नये.

हे पण वाचा :- दिलासादायक ! महिला शेतकऱ्यांच्या अपघाती मृत्यूनंतर वारसाला मिळणार ‘इतक्या’ लाखांचे अनुदान; योजनेचे स्वरूप, पात्रता, कागदपत्राविषयी वाचा….

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts