Soybean Market Latest Update : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित होणार एक मुख्य नगदी पीक. या पिकावर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे अर्थकारण फिरत आहे. अशा परिस्थितीत या पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांचे अवलंबित्व पाहता सोयाबीनला मिळत असलेल्या दरावरच शेतकऱ्यांचा फायदा किंवा तोटा हा ठरत असतो.
दरम्यान गेल्यावर्षी याला चांगला दर मिळाला परिणामी यंदा सोयाबीन लागवड वाढली. शेतकऱ्यांना वाटत होतं की या हंगामात गेल्या हंगामा प्रमाणे चांगला दर मिळेल आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील. मात्र तूर्तासं सोयाबीन दर दबावात आहेत. अशा स्थितीत विक्रमी दराच्या आशेने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवल आहे.
दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील दोन दिवसांपासून कमी होत आहेत. काल तर सोयाबीनचे वायदे १५.०९ डाॅलर प्रतिबुशेल्सवर बंद झाले होते. भारतीय चलनात हा दर ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल एवढा होतो. साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय बाजाराच्या तुलनेत कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.
अशा परिस्थितीत जागतिक बाजारात गेल्या काही दिवसांपासून रोजाना वाढ होत होती. मात्र त्यावेळी जागतिक बाजारातील दर चढे असल्याची परिस्थिती निर्माण करून देशांतर्गत सोयाबीन दर स्थिर ठेवण्यात आले. मात्र आता जागतिक बाजारात गेल्या दोन दिवसांपासून दरात घसरण झाली आणि लगेचच देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव खाली आलेत.
काल सोयाबीन दरात शंभर रुपये प्रतिक्विंटल पर्यंतची घसरण नमूद करण्यात आली. देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव 5200 ते 5300 या दरम्यान नमूद करण्यात आले. निश्चितच हा दर जागतिक बाजाराच्या तुलनेत अजूनही जास्त आहे. मात्र, यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा आणि निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला असल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना दरात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. अशातच जाणकार लोकांनी जानेवारीच्या शेवटी सोयाबीन दरात वृद्धी होणार असल्याचा दावा केला आहे. जाणकारांच्या मते सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होऊ शकते. अशा परिस्थितीत साडेपाच हजार रुपये पेक्षा कमी भावात सोयाबीन विक्री करू नये असे देखील जाणकारांनी नमूद केल आहे.