स्पेशल

मोठी बातमी! सोयाबीन दरात आजही वाढ; पण सोयाबीनला 7000 चा दर मिळणार का? पहा काय म्हणताय तज्ञ

Soybean Market Price : सोयाबीन उत्पादकांना गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थोडासा सुखद धक्का मिळत आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सोयाबीन दरात रोजाना थोडी थोडी वाढ नमूद केली जात आहे. मात्र गत हंगामाची तुलना केली असता सध्या मिळत असलेला दर हा खूपच नगण्य आहे. गेल्या हंगामात सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल त्या आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत होता.

सध्या मात्र सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. 5200 ते 5400 दरम्यान कमाल बाजार भाव सध्या स्थितीला सोयाबीनला मिळत आहे. दोन आठवड्यापूर्वी मिळणाऱ्या दरापेक्षा मात्र सध्या स्थितीला मिळत असलेला दर किंचित अधिक आहे. गेल्या तीन ते चार दिवसात सोयाबीन दरात तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे.

मात्र ही दरवाढ राज्यातील सर्वच एपीएमसी मध्ये झाली असे नाही तर काही तुरळक एपीएमसी मध्ये तर वाढ झाली आहे. काही ठिकाणी अद्यापही सोयाबीन दर पाच हजारापेक्षा कमीच आहेत. मात्र दरवाढ होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. अशातच सोयाबीनला गेल्या हंगामा प्रमाणे 7 हजाराचा दर मिळेल का हा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र जाणकार लोक देखील सात हजाराचा दर या हंगामात मिळेल असा अंदाज वर्तवत नाहीयेत.

जाणकारांच्या मते, सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच्या भावात आगामी काही दिवसांत विक्री होऊ शकतो. कृषी क्षेत्रातील तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून सोया पेंड निर्यात हळूहळू वाढत आहे. यामुळे दरात बळकटी येईल. दरवाढीसाठी पोषक परिस्थिती आहे. सोयाबीनचे दर पाच हजार पाचशे ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल इतकेचं या हंगामात राहतील असे देखील त्यांनी नमूद केले आहे.

सध्या स्थितीला मात्र साडेपाच हजारापेक्षाही कमी दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांचीं आर्थिक कोंडी होत आहे. पण आगामी काही दिवसात यामध्ये थोडीशी अजून वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. अशातच आज राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला नेमका काय भाव मिळाला आहे याविषयी आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. राज्यातील 13 फेब्रुवारी 2022 रोजीचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Soybean Rate : 13 फेब्रुवारी 2022 राज्यातील प्रमुख बाजारातील सोयाबीन बाजारभाव, पहा एका क्लिकवर 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts