Soybean Market Price : आज लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक थोडीशी दिलासादायक अशी बातमी समोर येत आहे. आज लातूर एपीएमसीमध्ये साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर नमूद करण्यात आला आहे. गेल्या महिन्याभराच्या दराशी तुलना केली असता जवळपास 500 रुपये प्रति क्विंटल इतका अधिक दर या एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला.
खरं पाहता गेल्या दोन महिन्याभरापासून सोयाबीनचे दर दबावात आहेत. नोव्हेंबर महिन्यापर्यंत सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटल इतक्या सरासरी भाव पातळीवर विक्री होत होता. मात्र नोव्हेंबर महिन्यानंतर सोयाबीन दरात मोठी घट पाहायला मिळाली. डिसेंबरमध्ये सोयाबीन दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी झालेत.
जवळपास तेव्हापासून सोयाबीन दरातील ही घसरण कायम राहिली. सोयाबीनचे बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच राहिले. मात्र आता सोयाबीन दरात वाढ झाली आहे. लातूर एपीएमसी मध्ये 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल भाव आज सोयाबीनला मिळाला आहे. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान जाणकार लोकांनी या हंगामात सोयाबीनला 5500 ते 6000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान भाव मिळेल असा अंदाज बांधला आहे.
तज्ञ लोकांच्या मते देशातून सोयापेंड निर्यातीसाठी परिस्थिती अनुकूल बनली आहे. विशेष बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यात सद्यस्थितीला होत आहे. यामुळे सोयाबीन दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता आहे. निश्चितचं गेल्या काही दिवसांपासून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बाब आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
Soybean Rate : खुशखबर ! सोयाबीन दरात मोठी वाढ; वाचा आजचे बाजारभाव