स्पेशल

आनंदाची बातमी ! जागतिक बाजारात सोयापेंड तेजीत, देशातही झाली सोयाबीन दरात सुधारणा; आता सोयाबीन 7000 चा टप्पा गाठणार का? काय म्हणताय तज्ञ

Soybean Market Price : गेल्या चार दिवसांपासून देशाअंतर्गत सोयाबीन बाजारभावात थोडीशी वाढ नमूद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मंदीमध्ये सुरू असलेला बाजार तेजीत आला आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. दरम्यान जाणकार लोकांनी जागतिक बाजारात सोयापेंड दरात तेजी असल्याचे सांगितले.

अशा परिस्थितीत आता सोयाबीनचे बाजार भाव गेल्या हंगामा प्रमाणे विक्रमी बनतील का? सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळेल का? हा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान आज आपण यावर जाणकार लोक काय मत व्यक्त करतात हे जाणून घेणार आहोत.

या संपूर्ण आठवड्यात देशांतर्गत सोयाबीन दरात क्विंटल मागे तीनशे रुपयांची वाढ नमूद झाली आहे. जाणकार लोकांनी पुढील आठवड्यात सोयाबीन दरात वाढ होणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. सोमवारी 4800 ते 5,100 यादरम्यान सोयाबीनला भाव मिळत होता. मात्र शनिवारी यामध्ये मोठी वाढ झाली बाजारभाव 5,100 ते 5400 दरम्यान पोहोचले. अर्थातच क्विंटल मागे तीनशे रुपयांची सुधारणा झाली. विशेष म्हणजे सोया पेंड चे दर देखील बाजारात सुधारले आहेत.

मात्र सोयाबीनचे दर आंतरराष्ट्रीय दरापेक्षा कमी आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात निर्यात देशातून वाढत आहे. यामुळे देशाअंतर्गत सोयाबीन बाजार भाव वाढत असल्याचे सांगितले जात असून पुढील आठवड्यात अजून यामध्ये वाढ होणार आहे. विशेष बाब म्हणजे जागतिक बाजारात सोयापेंड तेजीतच राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी बांधला आहे. साहजिक यामुळे देशातून मोठ्या प्रमाणात सोया पेंड निर्यात होण्याचे चान्सेस आहेत.

दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारात सोयाबीन आणि सोया पेंड तेजीत आहेत. मागणी वाढल्याने ही तेजी आहे. अशातच भारतातून सोया पेंड मोठ्या प्रमाणात निर्यात होत आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताचा सोया पेंड स्वस्त असल्याने याची निर्यात वाढत आहे. चालू आठवड्यात तीनशे रुपयांची सोयाबीन दरात वाढ झाली आहे. पुढील आठवड्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांचा जो प्रश्न आहे की या वर्षी गेल्या हंगामा प्रमाणे 7000 चा विक्रमी दर सोयाबीनला मिळेल का? तर यावर उत्तर देताना जाणकार लोक सांगतात की यावर्षी सोयाबीनला 5000 ते 6000 रुपये प्रति क्विंटल दरम्यानच दर मिळणार आहे अधिक दर या हंगामात मिळणार नाही. एकंदरीत काय तर सोयाबीन दरात अजून थोडी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र गेल्या हंगामाप्रमाणे विक्रमी दर मिळणार नाही असं जाणकार लोक सांगत आहेत. 

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts