Soybean Market : सोयाबीन हे राज्यातीलं बहुतांशी शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश जवळपास सर्वच विभागात या पिकाची थोड्याफार प्रमाणात शेती केलीच जाते. गत हंगामात सोयाबीनला चांगला भाव मिळाला असल्याने यंदा सोयाबीनची पेरणी मात्र वाढली आहे. पण असे असले तरी अतिवृष्टी आणि खरीप हंगामात आलेल्या ढगाळ हवामानामुळे सोयाबीन पीक उत्पादनात घट झाली आहे.
मात्र तरीही या हंगामात गेल्या हंगामापेक्षा कमीच बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे. गेल्या हंगामात सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री झाला होता यंदा मात्र सोयाबीन पाच हजार ते साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होत आहे. अपेक्षित बाजार भाव मिळत नसल्याने सध्या बाजारात सोयाबीनची आवक खूपच कमी झाली आहे.
हे पण वाचा :- युवा शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी! टोमॅटो पिकातून साधली आर्थिक प्रगती, ‘अस’ केलं नियोजन
वास्तविक गेल्या हंगामामध्ये सुरुवातीच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यानच आपला सोयाबीन विक्री केला होता. तदनंतर मात्र सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानंतर सोयाबीनचे भाव वाढले होते. त्यावेळी मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नव्हता. यामुळे साठवणूक केलेल्या व्यापाऱ्यांनाच गेल्या हंगामात फायदा मिळाला.
आता गत हंगामाप्रमाणे याही हंगामात परिस्थिती तयार झाली, हंगाम सरताना भाव वाढ झाली तर फायदा होईल पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील या आशेने आता शेतकऱ्यानी सोयाबीन केवळ गरजेपुरताच विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोयाबीनच्या साठवणुकीवरच शेतकऱ्यांचा अधिक मदार असल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच गेल्या हंगामात आलेल्या अनुभवावरून आता शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा आढावा घेत, व्यापारी धोरण अंगीकारत टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्रीचे नियोजन आखल आहे.
अशा परिस्थितीत जर हंगाम करताना सोयाबीन दरात वाढ झाली तर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगले उत्पन्न सोयाबीन पिकातून मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे. सोयाबीनची विक्री घटली असल्याने बाजारात सोयाबीन आवक खूपच कमी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या या व्यापारी धोरणामुळे मागणीनुसार पुरवठासाखळी विस्कळीत होऊन दरवाढ होईल का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे.
निश्चितच बाजारात चांगला दर मिळाला तेव्हा विक्री आणि कमी दर मिळाला तेव्हा साठवणूक हा जर शेतकऱ्यांचा फॉर्म्युला यंदाच्या हंगामात लागू झाला आणि हंगाम सरतेशेवटी सोयाबीन दरात वाढ झाली तर निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि उत्पादनात झालेली तुट यामुळे भरून काढता येणे त्यांना शक्य होईल.
हे पण वाचा :- ब्रेकिंग! राज्य कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक; संपात सामील झालेल्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश निर्गमित