Soybean Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी आहे. सोयाबीन दरात दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. मात्र दरात झालेली ही वाढ शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी पुरेशी नसल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसला. सोयाबीनच्या उत्पादनात कधी नव्हे ती घट झाली. अतिवृष्टी सततचा पाऊस यामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते.
अशा परिस्थितीत सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन या हंगामात मिळालेले नाही. उत्पादनात घट झाली मात्र वाढीव दरातून ही घट भरून निघेल अशी भोळी-भाबडी अशा शेतकऱ्यांना होती. शिवाय गत हंगामात सोयाबीन विक्रमी भावात विक्री झाला असल्याने याही हंगामात तसा दर मिळेल अशी शेतकऱ्यांना खात्रीच होती. मात्र या हंगामात अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावात आहेत.
मध्यंतरी सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात आणि 6500 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल बाजार भावापर्यंत विक्री होत होता. मात्र हा बाजारभाव जास्त काळ टिकू शकला नाही. गेल्या तीन दिवसांपासून दरात आता वाढ होत आहे. मात्र बाजार भाव अजूनही साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा खाली आहेत.
शेतकऱ्यांना किमान 6000 रुपये क्विंटल दर मिळावा अशी इच्छा आहे. तूर्तास मात्र दर त्याहीपेक्षा कमी आहेत. तज्ञ लोकांनी मात्र दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 6000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान यावर्षी सोयाबीनला भाव मिळू शकतो असं तज्ञ लोकांचे मत आहे.
दरम्यान आज आपण राज्यात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारातील आजचे सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Soybean Price : आनंदाची बातमी! सोयाबीन दरात आजही 300 रुपयाचीं वाढ; वाचा आजचे बाजार भाव