स्पेशल

दिलासादायक ! सोयाबीन दरातील तेजी कायम; ‘या’ बाजारात सोयाबीनला मिळाला विक्रमी दर, वाचा आजचे बाजारभाव

Soybean Rate : सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. आजही राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन दरात तेजीच होती. खरं पाहता गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून सोयाबीन दरात कमालीची मंदी होती. सोयाबीन बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा खाली आले होते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्च भरून काढणे देखील मुश्किल झाले होते.

मात्र आता सोयाबीन दरात तीनशे ते चारशे रुपयांची वाढ झाली आहे. तज्ञ लोकांनी सोयाबीन दरात आलेली तेजी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला असून येत्या काही दिवसात यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातून सोया पेंड निर्यातीसाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार होत असल्याने सोयाबीन दरातील तेजी कायम राहणार आहे.

तसेच जागतिक बाजारातही सोयाबीन दरात तेजी असल्याने देशांतर्गत सोयाबीन दर आगामी काही दिवस कायम राहणार असल्याचे चित्र आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला दर शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे नाही मात्र यामध्ये वाढ होण्याची आशा तज्ञ लोकांनी वर्तवली असल्याने निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत. जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आजचे राज्यातील प्रमुख बाजार समिती मधील सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Soybean Market Price : महाराष्ट्रातील प्रमुख बाजारातील सोयाबीन बाजारभाव जाणून घ्या एका क्लिकवर 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts