स्पेशल

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ कारणामुळे सोयाबीन दरात होणार विक्रमी वाढ; तज्ञ लोकांचा अंदाज

Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी विभागात शेती पाहायला मिळते. अर्थातच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण या नगदी पिकावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीन दर दबावात आहेत. अशातच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एक दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी सोयाबीन दरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे. येत्या आठ ते दहा दिवसात दरात वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ वर्तवत आहेत. यामुळे दरवाढीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी राहणार आहे. दरम्यान आज आपण सोयाबीन दरात किती वाढ होईल? दरवाढीचे कारणे काय राहतील? याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र शासन लवकरच खाद्यतेल आयातीरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे. सोबतच जगातील सर्वाधिक मोठा खाद्यतेल निर्यातदार देश अर्थातच इंडोनेशिया खाद्यतेल निर्यातीवर बंधन घालणार आहे. निश्चितच त्यामुळे खाद्यतेलाचा तुटवडा भासेल आणि दरवाढ होईल अशी शक्यता आता तयार होत आहे. तसेच जागतिक बाजारात सोया पेंड दर तेजीत आले आहेत.

यामुळे भारतीय सोया पेंडला देखील मागणी वाढण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीला सोया पेंड निर्यात समाधानकारक असून आगामी दिवसात यामध्ये वाढ होणार आहे. साहजिकच यामुळे सोया पेंड दरात वाढ होईल आणि याचा डायरेक्ट परिणाम म्हणून सोयाबीन दरात वाढ होण्याची शक्यता तज्ञ लोकांनी वर्तवली आहे. यासोबतच देशांतर्गत बाजारात सोया पेंड मोठ्या प्रमाणात मागणीमध्ये आहे. पोल्ट्री उद्योगाकडून आता सोया पेंड वापराला प्राधान्य दिले जात आहे.

यामुळे अभूतपूर्व अशी मागणी बाजारात पाहायला मिळत असून याचा परिणाम म्हणून सोयापेंडच्या दरात वाढ होणार आहे. शिवाय यापुढील काळात अशीच तेजी आता राहणार असून सोयाबीन दरात हमखास वाढ होण्याचीं आशा व्यक्त करण्यात आली आहे. जाणकारांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे जागतिक बाजारात सोयाबीन दरात तेजी आली असून आता उद्योगाच्या लॉबीला कृत्रिम पद्धतीने दर दबावात ठेवता येऊ शकत नाही कारण की देशांतर्गत सोयाबीनचा साठा मोठा कमी झाला आहे.

मध्यंतरी खाद्यतेलाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाचे या देशात झाली. याचा परिणाम मात्र सोयाबीन उत्पादकांना भोगाव लागला. खाद्यतेल मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारात आल्याने खाद्यतेलाचे दर घसरले परिणामी याचा फटका सोयाबीन दराला बसला. मात्र आता शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन आणि चालू वर्षात नऊ राज्यात विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणुका लक्षात घेता केंद्र शासनाकडून खाद्यतेल आयातीवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

भारतीय खाद्यतेल उद्योगाची देखील ही मागणी आहे. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळेल आणि दरात वाढ होईल असं सांगितलं जात आहे. एकंदरीत, जागतिक आणि देशांतर्गत या परिस्थितीचा विचार केला असता पुढील आठ ते दहा दिवसात तीनशे ते चारशे रुपये प्रतिक्विंटल सोयाबीन दरात वाढ होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts